पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/251

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९८ ज्ञानेश्वरवचनामृत. [ ၌ उनि दोन्ही आरसे । वोडवलियां सरिसे । कोण कोणा पाहातसे । कल्पावे पां॥ कां दीपान्समुख । ठेविलिया दीपक । कोण कोणा आर्थिक । कोण जाणे ॥ . ना ना अर्कापुढे अर्क । उदयलिया आणिक । कोण म्हणे प्रकाशक । प्रकाश्य कवण ॥ है निर्धारू जातां फुडें । निर्धारासि ठके पडे । ते दोघे जाले येवढे । संवाद सरिसे ॥ जी मिळतां दोन्ही उदके । माजि लवण वारूं ठाके। की तयांसीही निमिखें । तेचि होय ॥ तैसे श्रीकृष्ण अर्जुन दोन्ही । संवादले ते मनीं । धरितां मजही वानी। तेचि होतसे ॥ ऐसे म्हणे ना मोटके । तंव हिरोनि सात्त्विके। आठव नेला नेणों के । संजयपणाचा ॥ रोमांच जंव फरके । तंव तव आंग सुरके। स्तंभस्वदात जिंके । एकला कंप ॥ अद्वयानंदस्पर्श । दिठी रसमय जाली असे । ते अश्रु नव्हती जैसे । द्रवत्वचि ॥ नेणों काय न माय पोटीं । काय नेणों गुंपे कंठीं। वागा पडत मिठी। उससाचिया ॥ किंबहुना सात्विको आठा । चाचर मांडिता उमठां। संजय जाहलासे चोहटा । संवादसुखाचा ॥ ज्ञा. १८ १५८९-१६ ०७. १२. १ घासून. २ पुढे ठेवणे. ३ सारखें, एकासमोर एक. ४ इच्छा करणारा. ५ स्तब्धता. ६ क्षणांत. ७ प्रकार. ८ उभारे. ९ संकोचें. १० शब्दार्थाला. ११ श्वासोश्वास. १२ बोबडी वळली असतां. १३ आतिशय. १४ चवाठा.