पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/252

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- १७७] उपसंहार. १९९ ५. उपसंहार. १७७. जेथें देवभक्तांचा संयोग आहे तेथें विजय ठेवलेलाच आहे. यया बोला संजयो म्हणे । जी येरयेरांचे मी नेणे । परि आयुष्य तेथे जिणें । हे फुडें की गा॥ चंद्र तेथे चंद्रिका । शंभु तेथे अंबिका। संत तेथे विवेका । असणे की जी॥ रावो तेथे कटक । सौजन्य तेथे सोइरीक। वन्हि तेथे दाहक । सामर्थ्य की॥ दया तेथे धर्म । धर्म तेथे सुखागम । सुखीं पुरुषोत्तम । असे जैसा ॥ वसंत तेथ वने । वन तेथ सुमने । सुमनी पालिंगने । सारंगांचीं॥ गुरु तेथ ज्ञान ।शानी आत्मदर्शन। दर्शनी समाधान । आथि जैसे॥ भाग्य तेथ विलास । सुख तेथ उल्लास। है असो तेथ प्रकाश । सूर्य जेथे ॥ तैसे सकळ पुरुषार्थ । जेणे स्वामी कां सनाथ । तो श्रीकृष्णरावो जेथ । तेथ लक्ष्मी॥ आणि आपलनि कांतेसीं । ते जगदंबा जयापासीं। आणिमादिकी काय दासी । नव्हती तयांत ॥ कृष्ण विजयस्वरूप निजांगे। तो राहिला असे जेणे भागें। ते जय लागवेगें । तेथेचि आहे ॥ विजयी नामें अर्जुन विख्यात । विजयस्वरूप श्रीकृष्णनाथ । श्रियेसी विजय निश्चित । तेथेंचि असे ॥ १ जगणे. २ निश्चयेंकरून. ३ समुदाय. ४ भ्रमरांची.