पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/250

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

.६ १७६] साक्षात्कारः १९७ १.७५. आत्मानुभवाचा पट्टाभिषेक... तयावरी जैत रे जैत । म्हणोनि ध्यानाचे निशाण वाजत। ... दिसे तन्मयाचे झळकत । एकछत्र ॥ पाठी समाधीश्रियेचा अशेखा । आत्मानुभवराज्यसुखा। पट्टाभिषेक देखा । समरसे जाहला ॥ ___ ज्ञा. ९. २१७-२१८... १७६. देवभक्तांचा आत्यंतिक संयोग. अगा पूर्वापर सागर । यया नामासींचि सिनार । येर आघवे ते नीर । एक जैसे ॥ तैसा श्रीकृष्ण पार्थ ऐसें । हे आंगाचिपासी दिसे। मग संवादी जी नसे । कांहींच भेद ॥ पैं दर्पणाहूनि चोखे । दोन्हीं होती सन्मुखें। तेथ येरी येरें देखें । आपण जैसे ॥ तैसा देवेसीं पडुसुत । आपण देवी देखत। पांडवेसीं देखे अनंत । आपण पार्थी॥ देव देवाभक्तालागीं । जिये विवर देखे आंगीं। येरेही तियेचि भागीं। दोन्ही देखे ॥ आणिक कांहींचि नाहीं । म्हणौनि करिती काई। दोघे येकपणे पाहीं । नांदताती॥ आतां भेद जरी मोडे । तरी प्रश्नोत्तर कां घडे । ना भेदचि तरी जोडे । संवादसुख कां ॥ ऐसे बोलतां दुजेपणे । संवादी द्वैत गिळणे । ते आइकिले बोलणे । दोघांचे मियां ॥ १ नगारा. २ वेगळेपणा. ३ पाणी. ४ छिद्र. ५ दुसरा, अर्जुन.