पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना. (*) खरे पाहिले असतां विठ्ठल व रुष्ण यांत ज्ञानेश्वरांस भेद वाटत नसल्याने व कृष्णाचा तर ज्ञानेश्वरीमध्ये घडोघडी निर्देश असल्याने विठ्ठलाचा स्वतंत्र रीतीनें नामनिर्देश करण्याचे ज्ञानेश्वरांस फारसे प्रयोजन पडले नसावे. ज्ञानेश्वरी अध्याय ९ ओवी २१० मध्ये "रुष्ण विष्णु हरि गोविंद । या नामांचे निखिल प्रबंध" या ओवीत कोणत्याही नांवानें देवास संबोधिलें असतां हरकत.. नाही मग त्यास रुष्ण म्हणा, अगर विठ्ठल म्हणा, असा अर्थच ज्ञानेश्वरांस अभिप्रेत आहे. (५) काही लोकांचे म्हणणे तर असे आहे की, ज्ञानेश्वरीकार हे शैव होते, व त्यांस विष्णुभक्ति माहीत नव्हती. यास उत्तर ग्रंथांक २ मध्ये दिलें आहे. तथापि येथे इतके म्हणण्यास हरकत नाही की ज्याप्रमाणे वर विष्णस कोणत्याही नांवाने पाचारिलें असतां हरकत नाही असे ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे, त्याप्रमाणे देवास कोणत्याही नांवाने संबोधिलें असतां हरकत नाही, मग त्यास शिव म्हणा अगर विष्णु म्हणा, अशीच ज्ञानेश्वरांची भावना होती. ज्ञानेश्वरी अध्याय १७ ओंवी २२३ मध्ये वाग्भवतपाचे वर्णन करीत असतां तोंडांत कोणतेही नांव आले तरी हरकत नाही, मगते शैव असो किंवा वैष्णव असो, असाच उदारपणाचा उपदेश ज्ञानेश्वरांनी केला आहे. ज्यांस सर्वच देव येथून तेथून सारखे, रुष्ण असो, विष्णु असो, हरि असो, विठ्ठल असो, अगर शिव असो, त्या ज्ञानेश्वरांनी यापैकी एखाद्या देवाचा उल्लेख केला नाही म्हणून त्याबद्दलची भक्ति त्यांचे ठायी नव्हती असें म्हणता येणार नाही. ज्ञानेश्वरांच्या अभंगांतून तर विठ्ठलाचें नाम जागोजागी आले आहे, व हे अभंग जर ज्ञानेश्वरीकारांचेच आहेत असे आपणांस सिद्ध करतां आलें-आणि ही गोष्ट ग्रंथांक २ मध्ये आपण सिद्ध करूं-तर ज्ञानेश्वरीकार विठ्ठलभक्त होते याबद्दल संशय राहणार नाही. तत्त्वज्ञान. ७. आतां आपण ज्ञानेश्वरीतील ज्ञानेश्वरांची सर्वांगीण शिकवण कशी होती याचा थोडक्यात विचार करूं. ज्ञानेश्वरीची भाषा इतकी अर्थपूर्ण व विचारपूर्ण आहे की, ज्ञानेश्वरांचे हृद्गत पूर्णपणे समजण्यास एक मोठा ग्रंथच लिहावा लागेल. हल्लीच्या आपल्या प्रस्तावनेंत स्थलसंकोचामुळे या विषयाचा थोडक्यांतच विचार