पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्ञानेश्वरवचनामृत. शंकराची पिंडी असल्याचे ऐकिवांन नाही, यावरून वरील ओव्या पंढरपूरच्या विठ्ठलासच अनुलक्षून लिहिल्या गेल्या असाव्यात असे म्हणण्यास हरकत नाही. (२) याखेरीज आणखी एका ठिकाणी ज्ञानेश्वरांनी गीताप्रासादाचे वर्णन करीत असतां पंढरीस विठोबास भेटण्याची जी एक पद्धत होती तीस अनुलक्षनच पुढील ओव्या लिहिल्या असाव्यात असे वाटतेः ऐसा व्यासे विदाणिये । गीता प्रासाद सोडणिये । आणूनि राखिले प्राणिये । नानापरी ॥ एक प्रदक्षिणा जपाचिया । बाहेरोनि करिती यया । एक ते श्रवणमिषे छाया । सेविती ययाची ॥ एक ते अवधानाचा पुरा । विडापाऊड भीतरां । घेऊनि रिघती गाभारां । अर्थज्ञानाच्या ॥ ते निजबोधे उराउरी । भेटती आत्मया श्रीहरी । परी मोक्षप्रासादी सरी । सर्वांही आथी ॥ समर्थाचिये पंक्तिभोजनें । तळिल्या वरिल्या एकचि पक्काने । तेविं श्रवणें अर्थे पठणें । मोक्षचि लाभे ॥ ज्ञा. १८. ४-४८, या ओव्यांत “निजबोधे हरीस भक्त उराउरी" कसे भेटतात याचा मोठ्या गौरवाने ज्ञानेश्वरांनी उल्लेख केला आहे. विठ्ठलाच्या मूर्तीस उराउरी भेटण्याची पद्धत ही पंढरपुरासच व विठ्ठलसांप्रदायांतच असून अन्यत्र कोठे दिसून येत नाही. यावरून या ओंव्यांतही पंढरपूरच्या विठ्ठलभक्तीचा उल्लेख असला पाहिजे असें दिसते. (३) जरी प्रत्यक्ष विठ्ठल हा शब्द ज्ञानेश्वरीत आला नसला, तथापि विठ्ठलसांप्रदायाचे आधारभूत जे "संत" त्यांचा पुष्कळ ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये उल्लेख आला आहे; उदाहरणार्थ, “आत्मज्ञाने चोखडीं। संत हे माझी रूपडी" ज्ञा. १८ " संताते पाहतां गिंवसावें " ज्ञा. १८, " ज्ञानदेव म्हणे तुम्हीं। संत वोळगावति आम्हीं । हे पढविलों जी स्वामी । निवृत्तिदेवी" ज्ञा. १२. आतां “संत " हा शब्द पंढरपूरच्या सांप्रदायांत जितका ऐकिवांत आहे तितका तो अन्यत्र नाही. त्याप्रमाणेच, विठ्ठलसांप्रदायाचा आणखी एक आधारस्तंभ म्हणजे कीर्तनभक्ति, तिचाही उल्लेख ज्ञानेश्वरांनी गौरवाने ज्ञानेश्वरीत केला आहे. " कीर्तनाचेनि नटनाचे । नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे । जें नामचि नाही पापाचें । ऐसें केलें॥" या ज्ञा. ९ मधील उताऱ्यावरून ज्ञानेश्वरांनी कीर्तनाचे किती गोडवे गाइले आहेत हे दिसून येईल.