पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्ञानेश्वरवचनामृत. करणे प्राप्त आहे. प्रथम ज्ञानेश्वरांनी आपले गुरु निवृत्तिनाथ यांचे वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये जे जागजागी केले आहे त्याचा आपण थोडक्यांत विचार करूं. केनोपनिषदांत सांगितल्याप्रमाणे जाणणे म्हणजे नेणणे होय, व नेणणे म्हणजे जाणणे होय, या मतास अनुसरून ज्ञानेश्वरांनी आपल्या गुरुचे वर्णन करता येणे अशक्य आहे,. असे लिहिले आहे. गुरूचे वर्णन करूं गेल्यास कल्पतरूवर फुलांचा हार चढविणे, क्षीरसागरास पाहुणचार करणे, अगर कापुरास सुवास देणे याप्रमाणेच हास्यास्पद होणार आहे. सोन्यास रुप्याचा मुलामा चढवावा त्याप्रमाणेच गुरुची स्तुति करणे हे असून, निवांत रीतीने नमन करणे हेच गुरूचे वर्णन होय ( क्र. ५). गुरुकृपा. प्रसादरूपाने अंगावर गंगेप्रमाणे धाऊन आली असतां विषयविष व शोक ही दोन्ही नाहीशी होतात. गुरुरूपा ही आधारशक्तीच्या अंकावर बालकाप्रमाणे साधकास वाढवीत असून ती हृदयाकाशमंचकावर त्यास झोके देते; त्यापुढे प्रत्यज्योतीची ओवाळणी करून आत्मसुखाची बाळलेणी ती त्याच्या अंगावर लेवविते; सतराव्या अमृतकलेचें दुग्ध त्यास प्राशून अनाहताचा हलर वाजविते, व समाधिबोधामध्ये ती त्यास निजविते ( क्र. ६ ). अशा गुरुकृपेचे वर्णन करणे म्हणजे एखाद्या रकानें अमृताचा सागर पाहिल्यावर त्यास भाजीचा नजराणा करण्याप्रमाणेच होणार आहे ( क. १०). अशी ही. गुरुरूपा माझ्यावांचून अन्यत्र कोठेही नाही असे ज्ञानेश्वर म्हणतात; जणू काही मी माझ्या गुरूचा एकलता एक पुत्र आहे ! आधणांत खडे घातले असताही ते या गुरुकृपेने अमृतरूप बनतील. गुरूने अंगिकार केला असतां सगळा संसारच मोक्षमय होऊन जाईल (क्र. ११). या समर्थास करता येणार नाही असे या चराचरांत काय आहे ? वनांत पाने खाणा-या वानरांकडून या समर्थानं लंकेश्वराचा नाश करविला, व एकट्या अर्जुनाकडून अकरा अक्षौहिणी सैन्य जिंकविले; ही गुरुरूपा मजवर झाल्यास त्यांनीच लाविलेले हे सारस्वताचे गोड झाड रसभावफुलांनी फुलेल, व नानार्थफळभाराने लटकून सर्व जगास सुखाची प्राप्ति करून देईल (क्र. १२). आतां येथें व्यासादिक महा मुनींचा शिरकाव झाला म्हणून आम्हांस कोणी प्रतिबंध करील असे कधीही घडणार नाहीं; क्षीरसिंधूच्या तटावर गजांचे समुदाय पाणी पिण्यास आले असतां तेथें एखाद्या मुरकुटास कोणी प्रतिबंध करतो काय ? ज्या गगनान गरुडाने उड्डाण करावे, त्या गगनांतच ज्यास पांख फुटले आहेत नाहीत असें पांखरूंही आपल्या शक्तीप्रमाणे उडते. राजहंसाचे चालणे फार श्रेष्ठ झाले तरी दुसऱ्या -