पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/213

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्ञानेश्वरवचनामृत. [६१३५ जिव्हे आपली चवी चाखणे । चक्षु निज बुबुळ देखणे। आहे तया ऐसे निरीक्षणे । आपुले पैं।...॥ आपणचि आपणयातें । पाहिजे जे अद्वैत । ते ऐसे होय निरुते । बोलिजत असे ॥ जे पाहिजतेनवीण पाहिजे । कांहीं नेणणांचि जाणिजे। माद्यपुरुष म्हणिजे । जया ठायाते॥ तेथही उपाधीचा वोथंबा । घेऊनि श्रुति उभविती जिभा । मग नामरूपांचा वडंबा । करिती वायां ॥ पैं भवस्वर्गा उबगले । मुमुक्षु योगज्ञाना वळघले । पुढतीं न यो इया निगाले। पैजा जेथ ॥ संसाराचिया पायां पुढां । पळती वीतराग होडा। ओलांडोनि ब्रह्मपदाचा कर्मकडा । घालिती मागां॥ अहंतादिभावां आपुलियां । झाडा देउनी आघवेयां। पत्र घेती ज्ञानिये जया । मूळघरासी ॥...॥ पार्था ते वस्तु पहिले । आपण आपुले। पाहिजे जैसे हिंवले । हिंव हिवें ॥ आणीकही एक तया । पोळखण असे धनंजया। तरी कां जयाभेटीलया । येणेचि नाहीं॥ ज्ञा. १५. २६६-२८३. TETTE १३६. आत्मसुखाने विषयध्यानाचा नाश. जया आपण सांडूनि कहीं। इंद्रियग्रामावरी येणे नाहीं। तो विषय न सेवी हे काई । विचित्र येथ॥ सहजे स्वसुखाचेनि अपारे । सुरवाडलेनि अंतरे। रचिला म्हणऊनि बाहिरे। पाऊल न घाली ॥ १ आश्रय. २ अवडंबर. ३ कंटाळले. ४ अनुसरले. ५ पैजेनें. ६ थडवावें. ७ थंडी. ८ इंद्रियांचा समुदाय. ९ रंगलेल्या.