पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/212

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६१३५] साक्षात्कार. ऐसा कवणे ठायाहूनि तूं आलासी । पथ बैसलासी की उभा आहासी । आणि कवणिये मायेचिये पोर्टी होतासी । तुझे ठाण केवढे ॥ तुझे रूप वय कैसें । तुज पैलीकडे काय असे । तूं कायिसयावरी आहासी ऐसे । पाहिले मियां ॥ तंव देखिले जी आघवेंचि । तरि आतां तुझा ठाव तूंचि। तूं कवणाचा नव्हेसी ऐसाचि । अनादि आयता॥ तूं उभा ना बैठा । दिघडॉ ना खुजटा। तुज तळी वरी वैकुंठा । तूंचि आहासी ॥...॥ किंबहुना आतां । तुझे तूंचि आघवे अनंता। हे पुढतपुढती पाहातां । देखिले मियां ॥ __ ज्ञा. ११. २७१-२७९. १३५. आत्मसाक्षात्कार. ऐसेंनि गा वीरनाथा । आत्मज्ञानाचिया खड्गलता। छेदूनिया भवाश्वत्था । ऊर्ध्वमूळाते ॥ मग इदतैसी वाळले । जे मीपणेवीण डाहारले। ते रूप पाहिजे आपले । आपणचि ॥ परि दर्पणाचेनि आधारें। एकचि करून दुसरें। मुख पाहती गवारे । तैसें नको हो ॥ हे पाहणे ऐसे असे वीरा । जैसा न मोडलियां विहिरा । मग आपुलिया उगमी झरा । भरोनि ठाके॥ नातीर आटलीया अंभ । निजबिंबी प्रतिबिंब । नेहटे का नभी नभ । घटाभावीं॥ ना ना इंधनांश सरलेया। वन्हि परते जेवि आपणपयां। तैसे आपआप धनंजया । न्याहाळणे जे ॥ १ आकृति. २. दीर्घ, उचः ३ लहान. ४ तरंवारीनें. ५ हेपण. ६ नाहींसें झाले. ७ प्रसिद्धीस आलें. ८ मूर्ख. ९ पाणी. १. मिळतें. ११ नळण..