पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/211

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५८ ज्ञानेश्वरवचनामृत... [६१३२ ऐसे महात्मया श्रीहरीचे सहज । फांकतसे सर्वांगींचे तेज। ते मुनिकृपा जी मज । दृश्य जाहाले॥ - ज्ञा. १.१. १३७-२४१. १३३ ईश्वराचा सबाह्याभ्यंतर साक्षात्कार. ऐसी एकैक शृंगारशोभा । पाहतां अर्जुन जातसे क्षोभा। तेवींचि देव बैसला की उभा । शयांन हे नेणवे ॥ बाहर दिठी उघडोनि पाहे । तंव आघवे मूर्तिमय देखत आहे। मग आतां न पाहे म्हणोनि उगा राहे । तरी आंतही तैसेचि ॥ अनावर मुखें समोर देखे । तया भेणे पाठिमोरा जव ठाके । तंव तयाहीकडे श्रीमुखें । करचरण तैसे चि॥ अहो पाहतां कीर प्रतिभासे । येथ नवलावो काय असे । परि न पाहतांही दिसे । चोज आइका॥ . कैसे अनुग्रहाचे करणे । पार्थाचे पाहणे आणि न पाहणे । तयाही सकट नारायणे । व्यापूनि घेतले ॥ म्हणोनि आश्चर्याच्या पुरी एकीं । ठायठाव तेडी ठाकी। तंव चमत्काराचिया आणिकी। महार्णवीं पडे ॥... आणि दीप कां सूर्य प्रगटे । अथवा निमुटलिया देखावेंचि खुंटे। तैसी दिठी नव्हे जे वैकुंठे । दिधली आहे ॥ ज्ञा. ११. २२६-२३४. । १३४. ईश्वराचें अमेयत्व. है असो स्वर्गपाताळ । की भूमि दिशा अंतराळ। हे विवक्षा ठेली सकळ । मूर्तिमय देखतसे ॥...॥ .१ अस्वस्थतेप्रत. २ निजलेला. ३ आश्चर्य. ४ तात्काळ. ५ तीरी. ____६ मिटली असतां. ७ बोलणे. ८ राहिले. .