पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/210

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६.१३२] साक्षात्कार. १५७ देखें वोळंबा इंगळ न चरे । तेजी तिमिर न शिरे। जे दिहाचि आंधारे। चर्मचक्षसी॥ सुसडा सूर्यकिरणांच्या राशी। जो नित्यउदो ज्ञानियांसी। अस्तमानाचे जयासी । आडनांव नाहीं॥ ज्ञा. ८. ८७-९०.. १३१. “ और वो एक शिपाई." म्हणोनि मज आत्मयाचा भाव । जिहीं जियावया केला ठाय। एक मीवांचूनि वाव । येर मानिले॥ तया तत्त्वज्ञानचोखटां । दिवीं पोतासाची सुभटा। मग मीचि होऊनि दिवटी । पुढां पुढां चाले ॥ अज्ञानाचिये राती-। माजि तमाची मिळणी दाटती। ते नाशूनि घाली परौती । तयां करी नित्योदय ॥ ज्ञा. १०. १४१-१४३. १३२. ईश्वराचे अप्रतिम तेज. तिये अंगप्रभेचा देवा । नवलीवो काइसयाऐसा सांगावा। कल्पांती एकचि मेळावा । द्वादशादित्यांचा होय ॥ तैसे ते दिव्य सूर्य सहस्त्रवरी। जरी उदयजती कांएकेचिअवसरी। तरी जया तेजाची थोरी । उपमूं नये ॥ अवधियांचि विजूंचा मेळावा कीजे । आणि प्रळयाग्नीची सर्व सामुग्री आणिजे । तेवींच दशकही मेळविजे । महातेजांचा॥ तही तिये अंगप्रभेचेनि पाडें । हे तेज कांहीं होईल थोडें। आणि तया ऐसे कीर चोखडे । त्रिशुद्धी नोहें ॥ १ वाळवी. २ विस्तव. ३ अंधार. ४ दिवसा. ५ अतिशय सडिक, अथवा तेजस्वी. ६ दिवटी. ७ कापूर. ८ मशालजी. ९पलीकडे. १० अंगच्या तेजाचा. ११ आश्चर्य.