पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/209

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्ञानेश्वरवचनामृत. [६ १२९ ऐसें सानुरागें चित्तं । स्तवन केले पांडुसुते। मग पुढती म्हणे नमस्ते । नमस्ते प्रभो॥ पाठी तिये साद्यते । न्याहाळी श्रीमूर्तीत। आणि पुढती म्हणे नमस्ते । नमस्ते प्रभो॥ पाहत पाहतां प्रांत । समाधान पावे चित्ते। आणि पुढती म्हणे नमस्ते । नमस्ते प्रभो॥ इये चराचरी जी भूते । सर्वत्र देखे तयाते। आणि पुनः पुनः म्हणे नमस्ते । नमस्ते प्रभो ॥...॥ आणिक स्तुतीही नाठवे । आणि निवांतही नसवे । नेणों कैसा प्रेमभावें । गाजोचि लागे॥ किंबहुना इयापरी। नमन केले सहस्रवरी। की पुढती म्हणे श्रीहरी । तुज सन्मुखा नमो॥ देवासी पाठी पोट आथि की नाहीं। येणे उपयोग आम्हां काई। तरि तुज पाठिमोरेयाही । नमो स्वामी॥ उभा माझिये पाठीशीं । म्हणोनि पाठिमोरे म्हणावें तुम्हांसी। सन्मुख विन्मुख जगेसी । न घडे तुज ॥ आतां वेगळालेयां अवयवां । नेणे रूप करूं देवा । म्हणोनि नमो तुज सर्वा । सर्वात्मका ॥ ज्ञा. ११. ५ १९-५३२. १३०. ईश्वराचा ज्ञानियांस नित्य उदय. जे गगनाहुनि जुने । जे परमाणूहूनि साने । जयाचेनि सन्निधाने । विश्व चळे ॥ जे सर्वांते यया विये । विश्व सर्व जेणे जिये। हेतु जया बिहे । अचिंत्य जे ॥ १ सप्रेम. २ भाग. ३ न रहावें. ४ लहान. ५ तर्क. ६ भितो.