पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/208

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६ १२९] साक्षात्कार ऐसाही जरी विसी । बांधोनियां आकाशा। झोबती तरी क्लेशा । पात्र होती॥ म्हणोनि येर ते पार्था । नेणतीचि हे व्यथा। जे का भक्तिपंथा। वोठंगले ॥ ज्ञा. १२. ६०-७५. १२८. ईश्वराचे सर्वगत ध्यान. म्हणोनि सदा स्मरावें। मातेचि तुवां ॥ डोळां जे देखावे । कां कानी हन ऐकावें। मनी जे भावावें । बोलावे वाचे॥ ते आंत बाहेरी आघवे । मीचि करूनि घालावें। मग सकाळी स्वभावें। मीचि आहे ॥ अर्जुना ऐसे जाहालिया। मग न मरिजे देह गेलिया। मा संग्राम केलिया। भय काय तुज ॥ तूं मनबुद्धि साचेसीं । जरि माझिया स्वरूपी अर्पिसी। तरि मातेचि गा पावसी । हे माझी भाक॥ हचि कासिसयावरी होये। ऐसा जरी संदेह वर्तत आहे। तरी अभ्यासून आधी पाहे । मग नव्हे तरी कोपें ॥ ज्ञा. ८.७५--८०. १२९. देव सन्मुख विन्मुख दोहींकडे आहे. जी काय एक तूं नव्हसी । कवणे ठायीं नलसी। है असो जैसा आहासी। तैसिया नमो॥...॥ . १ धैर्य. २ आश्रय करून राहिले. ३ चिंतावें. ४ खरोखर. ५ शपथ.