पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/199

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्ञानेश्वरवचनामृत. [६११९ आतां येणे वचनतेजाकारें । फिटले आंतील बाहेरील आंधारें। म्हणोनि देखतसे साचोकारें । स्वरूप तुझे ॥...॥ 4 आणिकही एकेपरी । इये प्रतीतीची येतसे थोरी। जे मागे ऐसेंचि ऋषीश्वरी । सांगितले तूते ॥ परि तया सांगितलियांचे साचपण । हे आतांमाझे देखतसे अंतःकरण । जे कृपा केली आपण । म्हणोनि देवा॥ येन्हवीं नारद अखंड जवळा ये। तोही ऐसेंची वचनीं गाये। परि अर्थ न बुझोनि ठाये । गीतसुखचि ऐको॥ जी आंधळेयांच्या गांवीं । आपणपे प्रकटिले रवी। तरि तिहीं वोतपैलीची घ्यावी । वांचूनि प्रकाश कैंचा ॥ परि देवर्षि अध्यात्म गातां । आहाच रागांगसी जे मधुरता। तेचि फावे येर चित्ता । न लगेचि कांहीं ॥ 4 असितादेवलाचेनि मुखे । मी एवंविधा तूते आयिक। - परि ते बुद्धी विषयविखे । घारिली होती॥ विषयविषाचा पडिपाडु । गोड परमार्थ लागे कड़। कडु विषय तो गोडू। जीवासि जाहला ॥ आणि हे आणिकांचे काय सांगावें । राउळा आपणाच येउनी व्यासदेवे। तुझे स्वरूप आघवे । सर्वदा सांगिजे ॥ परि तो आंधारी चिंतामणि देखिला। जेविंनव्हे या बुद्धि उपेक्षिला। पाठी दिनोदयीं वोळखिला। होय म्हणोनि ॥ तैसीव्यासादिकांची बोलणीं। तियामजपासी चिद्रत्नांचिया खाणी। परि उपेक्षिल्या जात होतिया तरणी । तुजवीण कृष्णा॥ तेआतां वाक्यसूर्यकर तुझे फांकले। आणि ऋषींनी मार्ग होते जे कथिले । तया आघवेयांचंचि फिटले । अनोळखपण ॥ जी ज्ञानाचे बीज तयांचे बोल । माजि ह्रदयभूमिके पडिले सखोल । वरि इये कृपेची जाहाली वोल । म्हणोनि संवादफळ ॥ खरेपणा. २ समजता. ३ कोवळे ऊन. ४ वरवरच. ५ प्राप्त होई. ६ व्यापलेली. ७ सामर्थ्य ८ राजमंदिर. ९ टाकला. १० सूर्य...