पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/198

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४५ ६ ११९] साक्षात्कार. कां शाखा सानिया थोरा । परि आहाती एकाचि तरुवरां। बहुरश्मि परि दिनकरां । एकाचे जेवीं॥ तेविं नानाविधा व्यक्ती। आनाने नामें आनानी वृत्ति । ऐसे जाणती भेदलां भूतीं । अभेदा माते ॥...॥ नातरि जेधवां जिये ठायीं । कां देखती जे जे कांहीं। ते मीवांचूनि नाहीं । ऐसाचि बोध ॥...॥ तैसे भलतेथ भलतेणे भावे । भलतेही हो अथवा नोहावे । परि ते मी ऐसें आघवे । होऊनी ठेले ॥ अगा हे जेव्हडी माझी व्याप्ति । तेव्हडीचि तयांची प्रतीति। ऐसे बहुधाकारी वतेती। बहुतचि होऊनि ।।...॥ अगा तयांचिया ज्ञाना । पाठी पोट नाहीं अर्जुना। वायु जैसा गगना । सर्वांगी असे ॥ तैसा मी जेतुला आघवा । तेचि तुक तयांचिया सद्भावा । तरि न करितां पांडवा । भजन जाहाले॥ . ज्ञा. ९. २५०-२६१. ११९. प्रथम भक्तीकडे प्रहात्ति नसते. ऐसे प्रेमळांचेनि प्रियोत्तमे । बोलिलें जेथ पुरुषोत्तमे। तेथ अर्जुन मनोधर्मे । निवालों म्हणतसे ॥ हां हो जी अवधारा। भला केर फेडिला संसारा। जाहालो जननीजठरजोहरा- वेगळा प्रभु ॥ जी जन्मलेपण आपुले । हे आजि मियां डोळां देखिले। जीवित हातां चढले । आवडे तैसें ॥ आजि आयुष्या उजवण जाहाली । माझिया दैवा देशा उदयली। जे वाक्यकृपा लाधली । दैविकनि मुखे॥ १ लहान. २ भिन्न असलेल्या. ३ अथवा. ४ जेव्हां. ५ कस, वजन. ६ शांत झालो. ७ अडवून दिला. ८ मातेच्या उदरांतील अग्नि. ९ हवे तसे. १० साफल्य. ११ चांगले दिवस.