पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

. ज्ञानेश्वरवचनामृत. मायेच्या विरुद्ध जे आक्षेप घेतले आहेत तेच आक्षेप ज्ञानेश्वरांनी मायेच्या विरुद्ध अगर अज्ञानाच्या विरुद्ध घेतले आहेत असे दाखविले आहे. या गोष्टीचा आपण पुढेमागें केव्हांतरी विचार करू. आज आपल्यास अमृतानुभवाच्या तत्त्वज्ञानाचा विचार कर्तव्य नसून एकंदरीत ज्ञानेश्वरीतील ज्ञानेश्वरांचे तत्त्वज्ञान कप्तें होतें हेच पहावयाचे आहे. काहींकांच्या मते अमृतानुभव ग्रंथ हा ज्ञानेश्वरांनी अगोदर लिहिला अतून त्यानंतर ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला आहे; प्रो. वा. ब. पटवर्धन यांचे मत असे आहे. तथापि, एकंदरीत पाहतां अमृतानुभवामध्ये “वैकंठींचे सुजाणे । ज्ञानपाशी सत्यगुण । बांधिजे हे बोलणें । बहु केलें" (३.१७) अशी जी ओंबी आहे तिचा संदर्भ भगवद्गीता १४.६ "सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ" या श्लोकावर जी ज्ञानेश्वरीची व्याख्या आहे तिच्याशी लागत असल्याने व तीत सत्त्वगुणाने मनुष्य कसा बांधला जातो याची चर्चा बरीच केली असल्याने, अमृतानुभव ग्रंथ ज्ञानेश्वरनिंतर लिहिला असावा असे ह्मणण्यास बळकट आधार येतो. अमृतानुभवाचे तत्त्वज्ञान एकंदरीत नीरस आहे. रा. भावे यांनी मटल्याप्रमाणे " अमृतानुभव हा ग्रंथ झणजे एक शुद्ध रसायन आहे; यांत शर्करा नाही आणि यास अनुपानही नाही." ज्ञानेश्वरीची गोष्ट वेगळी आहे. उपमा, भाषासोदर्य, तत्त्वज्ञान, साक्षात्कार, भक्ति व अद्वेत यांची सांगड, अलौकिक निरीक्षणशक्ति, अप्रतिहत कवित्वशैली, अलोट वाड्रमाधुर्य, या सर्व गुणांच्या संमिश्रणाने असा ग्रंथ न भूतो न भविष्यति असे म्हणण्यास हरकत नाही. ज्ञानेश्वरांच्या अभंगांची गोष्ट जवळ जवळ तशीच आहे. त्यांबद्दल आम्ही ग्रंथांक २ यामध्ये विचार करीतच आहो. प्रस्तुत, ज्या ज्ञानेश्वरीच्या आधाराने आम्ही पुढील उतारे घेतले आहेत ती ज्ञानेश्वरी म्हटली म्हणजे एकनाथांनी संशोधन केलेली ज्ञानेश्वरी होय. एकनाथांच्या प्रतीत ९००० ओव्या असून रा. राजवाडे यांनी शोधून काढिलेल्या प्रतींत ८८९६ ओंव्या आहेत; म्हणजे एकनाथी ज्ञानेश्वरीपेक्षा राजवाडी ज्ञानेश्वरीत एकशें चार ओंव्या कमी आहेत. भाषेचा जुनेपणा, प्राचीन प्रयोग, जुनें व्याकरण, या दृष्टींनी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करावयाचा झाल्यास राजवाडे यांच्या ज्ञानेश्वरीचा फार उपयोग होणार आहे. तथापि, आपलें ! कार्य हल्ली ज्ञानेश्वरांचे तत्त्वज्ञान काय होते एवढेच पहावयाचे असल्याने ते एकनाथी ज्ञानेश्वरीवरूनही भागणार आहे. शिवाय, सर्वांच्या पाठांत एकनाथी ज्ञानेश्वरीच असल्याने त्या पाठांचा जितका लोकांस उपयोग होईल तितका दुस-या