पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना. पाठांपासून होणार नाही. या कारणामुळेच पुढे जे ज्ञानेश्वरीतून उतारे काढले. आहेत ते एकनाथी ज्ञानेश्वरीच्या आधारानेच काढले आहेत. ६. आता एकंदरीत ज्ञानेश्वरीमध्ये विठ्ठलभाक्ति अगर विठ्ठलभक्तिविषयक उल्लेख नाहीत अशा प्रकारचा जो एक आक्षेप ज्ञानेश्वरीवर घेण्यांत येतो त्याचा आपण थोडासा विचार करून नंतर ज्ञानेश्वरांचे तत्त्वज्ञान काय होते याच्या विचाराकडे वळू. (१) ज्ञानेश्वरी अध्याय १२ यांत ज्ञानेश्वरांनी पढीलप्रमाणे महेशास श्रीविष्णूनी डोक्यावर धारण केल्याचे लिहिले आहे:-- मग याहीवरी पार्था । माझ्या भजनी आस्था । तरी तयाते मी माथां । मुकुट करी ।। उत्तमासि मस्तक । खालविजे हे काय कौतुक । परी मान करिती तिन्ही लोक । पायवणियां ।। शरि श्रद्धावस्तुसि आदरु । करितां जाणिजे प्रकारु । जरी होय श्रीगुरु । सदाशिव ॥ परि हे असो आतां । महेशातें वानितां । आत्मस्तुती होतां । संचार असे ॥ ययालागी हे नोहे । म्हणितलें रमानाहें । अर्जना मी वाहं । शिरी तयातें ॥ ज्ञा. १२. २१४-२१८. यांत आपला निष्ठावंत भक्त शंकर यास विष्णनं आपल्या डोक्यावर धारण केले आहे असे म्हटले आहे. पंढर रास विठ्ठलाची जी मूर्ति आहे तिच्या डोक्यावर शंकराची पिंडी असल्याबद्दलचा जो समाज प्रचलित आहे त्यास अनुलक्षून वरील ओव्या लिहिल्या असाव्यात असे दिसते. निवृत्तिनाथांनी एक अभंग केला आहे त्यांतही पुंडलिकानें “ विष्णुसहित शिव" पंढरीस आणला असे लिहिले आहे: पुंडलिकाचे भाग्य वर्णावयां अमरी । नाहीं चराचरी ऐसा कोणी । विष्णुसहित शिव आणिला पंढरी । भीमातरी पखणे जेणें ॥ रामदासांनी आपल्या मनाच्या श्लोकांत विठोनें शिरीं वाहिला देवराणा । तया अंतरी ध्यास रे त्यासि नेणा ॥ अशा रीतीने विठ्ठलाच्या मूर्तीवर शंकराची पिंडी असल्याबद्दलचा स्पष्ट उल्लेख केला आहे. ज्ञानेश्वरीतून वर उद्धृत केलेल्या आंब्यांत ज्ञानेश्वरांनी विष्णूने आपला भक्त जोशंकर त्याचे महत्त्व वाढविण्याकरितां त्यास शिरी धारण केले आहे असे स्पष्ट लिहिले आहे. आतां पंढरपूर येथील मूर्तीखेरजि अन्यत्र कोठेही विठ्ठलाच्या मूर्तीवर