पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना. ठरविलें; व पंढरपुराहून कन्हाडच्या मार्गाने जाऊन त्यांनी हिंदुस्थानांतील पुष्कळ तीर्थं पाहिली. दिल्ली व बनारस या गांवांसही ज्ञानदेव व नामदेव गेले असावेत असे दिसते. तेथून ते जे परत आले, ते शके १२१८ च्या कार्तिक शुद्ध पौर्णिमेस पंढरपुरास पोंचले. या वेळचा पंढरपुरचा उत्सव फारच अवर्णनीय झाला. त्यानंतर ज्ञानेश्वरांनी आपली देह ठेवण्याची इच्छा दर्शविल्यावरून ज्ञानदेव व नामदेव इतर संतांसहवर्तमान आळंदीस आले. तेथें कार्तिक वद्य १३ दिवशी कथाकीर्तन करीत असतां ज्ञानेश्वरांनी देह ठेविला. " ज्ञानदेवें घेतलें दान । हृदयीं धरूनियां ध्यान । समाधि बैसला निर्वाण । कथा कीर्तन करीतु ॥ बालछंदो बावीस जन्में । तोडिली भवाब्धीची कम । चंद्रार्क तारांगणे रश्में । दान घेतला हरि" असा या समयींचा ज्ञानेश्वरांचा अभंग आहे.: ज्ञानेश्वरांच्या समाधीवर निवृत्तिनाथांनी चिरा ठेवला. त्या दुःखाची सरी कोणास द्यावी? ज्ञानेश्वरांनी बहुतकरून सिद्धेश्वराकडे तोंड करूनच समाधि घेतली असावी. ज्ञात्याने समाधीच्या काली उत्तराभिमुख बसावे हा नियम ज्ञानेश्वरांस लागू नव्हता. सिद्धेश्वराचे लिंग ज्ञानेश्वरांच्या समाधीच्या पश्चिमेस आहे. पण ज्यास "पूर्वपश्चिमभावच उरला नाहीं " त्यांस उत्तर काय, किंवा पश्चिम काय, दोन्ही दिशा समाधि घेण्यास सारख्याच होत ! ____५. ज्ञानेश्वरांचे चार प्रसिद्ध ग्रंथ म्हटले म्हणजे ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, अभंग, व चांगदेवपासष्टी हे होत. यांखेरीज त्यांच्या नांवावर मोडणारी आणखीही काही प्रकरणे आहेत; परंतु वरील चारच सर्वांत प्रसिद्ध आहेत. त्यांतल्या त्यांत ज्ञानेश्वरीसारखा अनुभव, काव्य, व तत्त्वज्ञान या तीन्ही दृष्टीनी पाहिले असतां मराठी भाषेत आजपर्यंत ग्रंथ झाला नाही, व इतर कोणत्याही भाषेत झाला आहे किंवा नाही याबद्दल शंकाच आहे. ज्ञानेश्वरी ही जरी गीतेवरील एक टीका असली तथापि स्वतंत्र ग्रंथ या नात्यानेच तिची फार किंमत आहे. या प्रस्तुतच्या ग्रंथांकांत ज्ञानेश्वरीमधूनच उतारे घेतलेले आहेत; व त्यांची विषयवार रचना करून ज्ञानेश्वरांचे तत्त्वज्ञान एकंदरीत कसें होते, हे त्यांच्याच शब्दांत सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ज्ञानेश्वरीतील अद्वैत म्हटले म्हणजे भक्तियुक्त अद्वैत होय. ही अद्वैतांतील भक्ति "अनुभवाचा विषय असून बोलण्याचा विषय नव्हे" असें ज्ञानेश्वरांनीच १८.११५१ मध्ये सांगितले आहे. अमृतानुभवाची गोष्ट जरा किंचित् निराळी आहे. रा. पांडुरंग ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी अमृतानुभवाचा अभ्यास करून त्यांत रामानुजांनी आपल्या श्रीभाष्यामध्ये शंकराचार्यांच्या