पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/189

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्ञानेश्वरवचनामृत. [६ १०८ ऐसा जो कामक्रोधलोभा । झाडी करूनि ठाके उभा। तोचि येवढिया लाभा । गोसावी होय ॥ ज्ञा. १६. ४२ ४-४ ४ ४. ४. साक्षात्कार. १०९. पंथराज. ऐसे विवरोनियां श्रीहरी । म्हणतिले तिये अवसरी। अर्जुना हा अवधारी । पंथराज ॥ तेथ प्रवृत्तितरूच्या बुडीं । दिसती निवृत्तिफळाचिया कोडी। जिये मार्गीचा कापडी। महेश आझुनी ॥ पैं योगिनूंदें वहिली । आडवी आकाशी निघालीं। की तेथ अनुभवाच्या पाउलीं। धोरण पडला ॥ तिहीं आत्मबोधाचेनि उजुकारें । धांव घेतली एकसरें। की येर सकळ मार्ग निदसुरे । सांडूनियां ॥ पाठी महर्षी येणे आले । साधकांचे सिद्ध जाहाले। आत्मविद थोरावले । येणेचि पंथे ॥ हा मार्ग जै देखिजे । तै ताहानभूक विसरिजे । रात्रिदिवस नेणिजे । वाटे इये॥ चालतां पाउल जेथ पडे । तेथ अपवर्गाची खाणी उघडे । आव्हांटलिया तरी जोडे । स्वर्गसुख ॥ 93 १ स्वामी. २ विवरण करून. ३ वेळेला. ४ संसारवृक्षाखाली. ५ मोक्षफल. ६राशी. ७ यात्रेकरू. ८ समुदाय. ९ आडव्या तिडव्या मार्गाने. १० रहदारोचा रस्ता. ११ सरळमार्गाने. १२ एकसारखी. १३ अज्ञानांतील. १४ नंतर. १५ मोक्षाची. १६ आडमागास गेले असतां.