पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/188

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३५ ६१०८] नीतिविचार.. काय बहु बोलू सुभटा । सांगितलिया निकृष्टा । .. नरकाचा दारवंठा । त्रिशंकु हा॥ या कामक्रोधलोमां- माजि जीवे जो होय उभा। तो निरेयपुरीची सभा । येथ पावे ॥...॥ धर्मादिकां चौहीआंत । पुरुषार्थाची तेंचि मात । करावी जै संघात । सांडील हा ॥ हे तीन्ही जीवीं जंव जागती । तंववरी निकियाची प्राप्ति । हे माझे कान नाइकती। देवही म्हणे ॥ जया आपणपे पढिये । आत्मनाशा जो बिहे । तेणे न धरावी हे सोये । सावध होइजे ॥ पोटीं बांधोनि पाषाण । समुद्री बाही आंगवण । कां जियावया जेवण । काळकूटाचे ॥ इही कामक्रोधलोभेसी । कार्यसिद्धि जाण तैसी। म्हणौनि ठावोचि पुसी। ययांचा गा॥...॥ त्रिदोषीं सांडिले शरीर । त्रिकुटी फिटलिया नगर। त्रिदाह निमालिया अंतर । जैसे होय ॥ तैसा कामादिकी तिघीं । सांडिला सुख पावोनि जगीं। संग लाहे मोक्षमार्गी । सज्जनांचा ॥ मग सत्संगे प्रबळे । सच्छास्त्राचेनि बळे। जन्ममृत्यूची निमाळे । निस्तरे राने ॥ ते वेळी आत्मानंदें आघवे । जे सदा वसते बरवे । ते तैसेचि पाटण पावे । गुरुकृपेचें ॥ तेथ प्रियाची परमसीमा। तो भेटे माउली आत्मा। तये खैवीं आटे डिंडिमा । सांसारिक हे ॥ ....... ..१ उंबरठा. २ नरक. ३ गोष्ट. ४ हिताची. ५ आवडते. ६ वात, पित्त, कफ. ७ चौरी, चहाडी, शिंदळकी. ८ आध्यात्मिक, आधिदैविक, आधिभौतिक ताप. ९ बरड. १० शहर. ११ आई. १२ आलिंगन, क्षण. १३ गलबला.