पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/168

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६.९.] नीतिविचार. नातरी एकाधे नांव । तेचि शैव कां वैष्णव । . ... वाचे वसे ते वाग्भव । तप जाणावें ॥ .. . ज्ञा. १७. २१५-२२३. ९०. मानसिक तप. आतां तप जे मानासक । तेही सांगों आइक । म्हणे लोकनाथनायक- नायकु तो॥ तरि सरोवर तरंगीं । सांडिले आकाश मेघीं। कां चंदनाचे उरगीं । उद्यान जैसे। ....... . ना ना कळावैषम्ये चंद्र । कां सांडिला आधीं नरेंद्र। ना तरि क्षीरसमुद्र । मंदराचळे ॥ तैसी नाना विकल्पजाळे । सांडूनि गेलिया सकळे । मन राहे कां केवळे । स्वरूप ज...॥ मग न चलते कळंकेंवीण । शशिबिंब जैसे नित्य पूर्ण । तैसें चोखी स्थिरपण । मनाचे जे ॥ बुजाली वैराग्याची वोरप । जिराली मनाची धापकांप । तेथ केवळ जाली वाफ । निजबोधाची ॥ म्हणौनि विचारावया शास्त्र ।राहाटवावे जे वक्त्र । ते वाचेचही सूत्र । हाती न धरीं ॥ ते स्वलाभ लाभलेपणे । मन मनपणाही धरूं नेणे । शिवतले जैसे लवणे । आपले निज ॥ तेथ के उठिती ते भाव । जिहीं इंद्रियमार्गी धांव। .... घेऊनि ठाकावे गांव । विषयांचे ते॥ .. म्हणोनि तिये मानसीं । भावशुद्धीचि असे आपैसी। रोमशुचि जैसी । तळहातासी ॥ १ सापांनीं. २ मानसिक व्यथा, चिंता. ३ शुद्धता, सात्विक भाव. ४ उत्कंठा. ५ शुद्धता.