पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/167

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११४ ज्ञानेश्वरवचनामृत. [६८८ वस्तु भूतमात्री नमिजे । परोपकारी भजिजे ॥. .... स्त्रीविषयीं नियमिजे । नांवा नांवा ॥ . : जन्मतेनि प्रसंग । स्त्रीदेह शिवणे आंगे। तेथूनि जन्म आघवें । सोवळे कीजे ॥...॥ ऐसैसी जै शरीरी । राहाटीची पडे उजरी। तै शारीर तप घुमरी । आले जाण ॥ - ज्ञा. १७. २००-२१३. ८९. वाङ्मय तप. एवं शारीर जे तप । तयाचे दाविले रूप। आतां आईक निष्पाप । वाइमय ते ॥ तरी लोहाचे आंग तुक । न तोडितांचि कनक। केले जैसे देख । परिसे तेणें ॥ तैसे न दुखवितां सहजे । जावळिया सुख निपजे। ऐसे साधुत्व कां देखिजे । बोलणां जिये ॥ पाणी मुदल झाडा जाये । तृण ते प्रसंगेचि जिये। तैसे एका बोलिले होये । सर्वाहि हित ॥ जोडे अमृताची सुरसरी । तें प्राणांत अमर करी। स्त्राने पाप ताप वारी । गोडीही दे ॥. तैसा अविवेकही फिटे । आपुल अनादित्व भेटे। आइकतां रुचि न विटे । पीयूषी जैसी ॥ जरी कोणी करणे पुसणे । तरी होआवे ऐसे बोलणे । नातरि आवर्तणे । निगम का नाम ॥ ऋग्वेदादि तिन्ही। प्रतिष्ठिजती वाग्भुवनीं । केली जैसी वदनीं । ब्रह्मशाळा ॥ . १ उत्कर्ष होतो. २ पूर्णतेस. ३ वजन. ४ गंगा. ५ पठण करणे. ६ वेदशाळा.