पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/166

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११३ ६८८] नीतिविचार, किंबहुना फळाशेंवीण । ऐसेया निगुती निर्माण। होय तो याग जाण । सात्विक गा॥ - ज्ञा. १७.१७०-१८४..... ८८. शारीर तप.. तरि तप जै को सम्यक् । तेही त्रिविध आइक । शारीर मानसिक । शाब्द गा॥ आतां या तिहीं माझारी । शारीर तंव अवधारी। तरी शंभू कां श्रीहरि । पढियंता होय ॥ तया प्रिय.देवतालया। यात्रादिकें करावया। आउही पाहार जैसे पाया। उळिग घापे ॥ देवांगण मिरवाणयां । अंगोपचार पुरवणियां । ... . करावया म्हणियां । शोभती हात ॥ लिंग का प्रतिमा दिठी। देखतखेवो अंगयष्टी। लोटिजे कां कांठी । पडली जैसी॥ आणि विद्याविनयादिकी । गुणी वडिल जे लोकीं। तया ब्राह्मणांची निकी । पाइकी कीजे ॥ अथवा प्रवासे कां पडिां। कां शिणले जे सांकडां। ते जीव सुरवाडा । आणिजती॥ . सकळ तीर्थोचिये धुरें। जिये कां मातापितरें। . तयां सेवेसी कीर शरोरें । लोण कीजे ॥ आणि संसारा ऐसा दारुण । जो भेटलाचि हरी शीण । तो शानदानीं सकरुण । भजिजे गुरू ॥ आणि स्वधर्माचा आगिठां। देह जाड्याचिया किटा। आवृत्तिपुटीं सुभटा । झाडी कीजे ॥ .....१ युक्तीने. २ भोंवरा, बिगार, वेठ. ३ सुशोभित करणे. ४ पाहतांच. ५ चांगली. ६ सुखाप्रतः ७ श्रेष्ठ, ८ अग्नीत ।