पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/165

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[8 ११२ ज्ञानेश्वरवचनामृत. ८७. सात्त्विक यज्ञ. तरि तिहींमाजी प्रथम । सात्विका यज्ञाचे वर्म। आईक पां सुमहिम- शिरोमणि ॥ तरि एक प्रियोत्तम-1 वांचोनि वाढों नेदीःकाम । जैसा कां मनोधर्म । पतिव्रतेचा ॥ ना ना सिंधूते ठाकूनि गंगा । पुढारांन करीचि रिगां । का आत्मा देखोनि उगा । वेद ठेला ॥ तैसें जे आपुल्या स्वहितीं। वेंचूनिया चित्तवृत्ति। नुरविताचि अहंकृति । फळालागीं ॥ पातलेया झाडाचे मूळ । मागुते सरो नेणेचि जळ। जिराले का केवळ । तयाच्याचि आंगीं। तैसे मने देहीं । यजननिश्चयाच्या ठाई। हारपोनि जे कांहीं। वांछिती ना ॥...॥ परि आरिसा आपण। डोळां जैसा घेपे । कां तळहातींचे दीपे । रत्न पाहिजे ॥ ना ना उदिते दिवाकरें। गमावा मार्ग दिठी भरे। तैसा वेदनिर्धारें । देखोनियां ॥...॥ सकळावयवउचित । लेणी पातली जैसी आंगातें। तैसे पदार्थ जेथिचे तेथे । विनियोगुनी ॥ काय वानूं बहुती बोलीं । जैसी सर्वाभरणी भरलीं। ते यक्षविद्याचि रूपा आली । यजनमिषे ॥ तैसा सांगोपांग । निपजे जो याग।... नुठवूनियां लोग । महत्त्वाचा ॥.. प्रतिपाळ तरी पाटांचा । झाडी कीजे तुळसीचा। परि फळा फुला छायेचा । आश्रय नाहीं॥ - - - १ पावून. २ शिरकाव. ३ प्राप्त झाले असतां. ४ चालण्याचा. ५ संबंधः । उत्कृष्ट.