पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्ञानेश्वरवचनामृत. रावर मत्स्येंद्रनाथांनी भग्नावयव चौरंगीनाथांस संपूर्णावयव केले असे दिसते (क्र. २ ). गोदावरीच्या उगमाजवळ ब्रह्मगिरीवर गोरक्षांची गुहा अद्यापि दाखविली जाते; व त्यांत एक लिंगही आहे. एकंदरीत इतकी गोष्ट खरी की, या नाथांचे मूळचे वसतिस्थान कोठलेही असो, निवृत्तिज्ञानेश्वरांदिकांस त्यांची भेट नाशिकजवळच झाली असावी. ज्ञानेश्वरांचे पणजे त्रिंबकपंत यांस आपेगांव येथे गोरक्षनाथांनी, व आजे गोविंदपंत यांस गहिनीनाथांनी, उपदेश दिल्याचे उल्लेख आहेत. गोरक्षांचे 'गोरक्षसंहिता' वगरे संस्कृत ग्रंथ प्रसिद्धच आहेत. तथापि रा. चांदोरकर यांनी मिळविलेलें, व रा. भावे यांनी ज्याचा उल्लेख केलेला आहे असें, गोरक्षांचे "अमरसंवाद' या नांवाचे प्रकरण मराठीतही उपलब्ध आहे. यांत पृष्ठमात्रा, शब्दांची जुनी रूपे, वगैरे असल्याने हे पुस्तक अकराव्या शतकांतलें असावे असे रा. भावे यांचे मत आहे. " आकाशकुसुमी जरी परिमळ भेटे। नातरी नालिये वांझेचे लेकरूं त्रिभुवन भोगी। ससेंचेया सोंगें तिषटें । हे बोलणेचि लटिकें " या या प्रकरणांतील ओंवीपासून ज्ञानेश्वरीतील कल्पनांस मूलभूत होण्यास हे प्रकरण कसे योग्य आहे हे दिसून येईल. 'गोरक्षगीता' या नांवाचे जे आणखी एक प्रकरण उपलब्ध आहे, त्यांत गोरक्षनाथांचा व गहिनीनाथांचा संवाद असल्याने त्याचे कर्तृत्व गहिनीनाथांकडे येते, असे रा. भावे यांचे मत आहे. गहिनीनाथांच्या या ग्रंथांत “ तेणें कामशक्ति खुटली। मग वायूतें ऊर्ध्वगति जाली। आला मणिपुराजवळी । देखिली बाळी कुंडली ॥ वेढे येकायकी उकली । बहुतां दिवसांची असे भुकेली । ऊर्च होऊनी मुखें. गिळी । वाहाटुळी गा" या ओव्यांवरून ज्ञानेश्वरीतील योगविषयक कल्पनांचे व या प्रकरणांतील कल्पनांचे किती साम्य आहे हे तज्ज्ञ वाचकांस सहज दिसून येईल. ज्ञानेश्वरांनी मत्स्येंद्र, गोरक्ष, व गहिनी या सर्वांचा उल्लेख ज्ञानेश्वरीच्या अखेरीस आपली जी गुरुपरंपरा दिली आहे तीत केला आहे. मत्स्येंद्रनाथांनी आपण 'अव्यत्यय समाधि' भोगावी या हेतूने गोरक्षनाथांस आपला सांप्रदाय वाढविण्याविषयी अधिकार दिला. गोरक्षनाथांनी ते आपलें 'शांभव वैभव' गहिनीनाथांस दिले. गहिनीनाथांनी मोठ्या रूपाळुपणाने ‘कलीमध्ये निमग्न झालेल्या लोकांस याने सोडवावें' म्हणून आपले सर्व आत्मज्ञान निवृत्तिनाथांस दिले. व निवृत्तिमेघापुढे मी चातक आपली चोंच पसरून बसल्याने त्यांतील दोनचार थेंबच माझ्या चोचीत आले आहेत असें ज्ञानेश्वरांनी मोठ्या नम्रपणाने म्हटले आहे (क्र. २).