पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना. सूत्रपाठ' या नावाचा एक ग्रंथ केला आहे; त्यांत चक्रधराच्या तोंडची वचने उद्भूत केली असून ती १६०९ आहेत, व ती सर्व मराठीत आहेत. “पुरुष जंचं जंवू पळे। तंव तं● विषो पाठी लागे । पुरुष जंवं जंवू पाठी लागे । तंव तंबू विषो पळे" अशा प्रकारची ही सूत्रे आहेत. चक्रधराच्या शिष्यांपैकी भारकर याने शके ११९५ मध्य 'शिशुपालवध' हा ग्रंथ रचला. "चाउली पडली अंतःकरणी । तंव म्हणे रुक्मिणी । हा गे कवण आंगणी । चाहाळ काइसा" अशा प्रकारच्या त्यांच्या ओंव्या आहेत. ज्यांचे शक उपलब्ध आहेत अशा इतर ग्रंथकारांपैकी केशवराजसूरि याने शके १२०६ त 'मूर्तिप्रकाश' या नावाचा ग्रंथ रचला. “की भरौनि नित्य सुखाचां ताटी। मियां ठेविली ब्रह्मरसाची वाटी । ते सुमनें लावोनि वोठी । पान करितु' अशा प्रकारचा त्याच्या ओंव्याचा मासला आहे. व सरासरी ज्ञानेश्वरी रचनेच्या समकालीन म्हणजे शके १२१३ मध्ये नरेंद्रपंडित याने 'रुक्मिणी-स्वयंवर' या नांवाचा आपला ग्रंथ संपविला. " म्हणौनि उपसाहावें सकळ श्रोतां । म्यां वर्णिली श्रीकृष्णकथा । जे पूर्वी व्यासादिकांशी कथितां । आली होती पुराणश्रुती" हा एक त्याच्या ओंव्यांचा मासला आहे. या सर्व ओव्यांचे ज्ञानेश्वरांच्या ओंव्यांशी किती साम्य आहे हे तज्ज्ञ वाचकांस सहज दिसून येईल. एकंदरीत पाहतां महानुभावपंथ विठ्ठलसांप्रदायापेक्षा कितीही भिन्न असला, तथापि त्या सांप्रदायाने मराठीतील काव्यरचना बरीच वाढविली हे खास. ३. ज्या परमार्थसांप्रदायामध्ये ज्ञानेश्वर निर्माण झाले तो सांप्रदाय म्हणजे नाथपंथाचा सांप्रदाय होय. ज्ञानेश्वरांनी क्रमांक २ मध्ये आपला सांप्रदाय मत्स्येंद्र, गोरक्ष, गहिनी यांपासून कसा आला याचे फार सुंदर वर्णन केले आहे. या नाथांचे राहण्याचे मूळचे स्थान कोणते याबद्दल अद्याप निश्चित निकाल झालेला नाही. बंगाल देशामध्ये, हिंदी प्रांतामध्ये, महाराष्ट्र देशांत, जेथें तेथें मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ, इत्यादिकांच्या कथा सारख्याच ऐकू येतात. त्यावरून हे नाथ अमुकच प्रांतांत मूळ होते असे सांगणे कठीण आहे. जालंधरमैनावतीची गोष्ट बंगाली दिसते. गोरक्षांची कांहीं पदें हिंदी भाषेतही आहेत. आपल्याकडे महाराष्ट्रांत सातारा जिल्ह्यांत मत्स्येंद्रगड या नांवाचा डोंगर, व गोरक्षचिंच या नावाचे झाडही या नाथांच्या स्मरणार्थ दाखविले जाते. गोरक्षांची समाधि नगर जिल्ह्यांत नेवाशाजवळ एका डोंगरांत दाखवितात. नाशिक जिल्ह्यांत त्र्यंबकेश्वरी गहिनीनाथांचा मठ प्रसिद्धच आहे. ज्ञानेश्वरांच्या लिहिण्यावरूनही त्र्यंबकेश्वराजवळच्या सप्तश्रृंग डोंग