पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना. ४. वर आपण त्रिंबकपंतांस गोरक्षनाथांचा उपदेश मिळाला म्हणून लिहिले आहे ते त्रिंबकपंत ज्ञानदेवांचे पणजे होत. शके ११२९ मध्ये हे हयात असून बीड परगण्याच्या मुख्य अधिका-याचे काम त्यांजकडे असावे असे दिसते. त्यांचे चिरंजीव गोविंदपंत यांस गहिनीनाथांचा उपदेश झाल्याचा उल्लेख आहे. यावरून ज्ञानेश्वरांस नाथपंथाचे बाळकडू आनुवंशिक संस्कारांमधूनच मिळाले असावे असें दिसते. ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत हे या गोविंदपंतांचे चिरंजीव होत, व पैठणनजीक गोदावरीच्या उत्तरेस आपेगांव या नांवाचे जे गांव आहे त्याचे कुलकर्णीपण यांजकडे असे. यांची वृत्ति प्रथमपासूनच वैराग्यशील होती. तथापि हे एकदां आलंदीस गेले असतां तेथील कुळकर्णी सिधोपंत यांस हा वर पसंत पडून त्यांनी आपली कन्या रखुमाबाई यांस दिली. काही वर्षे प्रपंच केल्यावर त्यांस पुत्ररत्न होईना, म्हणून त्यांचे आधीचेच वैराग्य प्रज्वलित होऊन बायकोकडून पडत्या फळाची आज्ञा घेऊन ते काशीस जाऊन रामानंद स्वामी यांस भेटले, व त्यांजकडून त्यांनी संन्यासदीक्षा मिळविली. इकडे रखुमाबाईस व सिधोपंतांस विठ्ठलपंतांचे मुळीच वर्तमान कळेना, म्हणून ती अंतःकरणांत खिन्न होऊन राहिली. कर्मधर्मसंयोगाने रामानंदस्वामी तीर्थयात्रेस जात असतां आळंदी हे प्रसिद्ध क्षेत्र असल्याने त्यांचा तेथे मुक्काम पडला. त्यावेळी रखुमाबाई व सिधोपंत यांजकडून सर्व वर्तमान कळून त्यांस वाईट वाटले, व काशीस गेल्यावर विठ्ठलपंतांस त्यांनी परत प्रपंचांत जाण्यास सांगितले. त्यांच्या आज्ञेप्रमाणे विठ्ठलपंत परत आले, व त्यांस निवृत्ति, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई ही अनुक्रमें चार मुले आपेगांव येथे झाली. जनाबाईचा एक अभंग उपलब्ध आहे त्याबरहुकूम पाहिले असतां निवृत्तींचा जन्म शके ११९० मध्ये होऊन पुढे तीन तीन वर्षांच्या अंतराने म्हणजे शके ११९३ मध्ये ज्ञानदेवांचा, ११९६ मध्ये सोपानांचा, व ११९९ मध्ये मुक्ताबाईंचा अनुक्रमें झाला. या जन्मसंवत्सरांपेक्षां निवृत्तिनाथांचा जन्म शके ११९५ मध्ये होऊन त्यानंतर दोन दोन वर्षांनी म्हणजे ज्ञानेश्वरांचा शके ११९७ त, सोपानांचा ११९९ त, व मुक्ताबाईंचा १२०१ मध्ये जन्म झाला असे मानण्याची जास्त वहिवाट आहे. याचे कारण असे की, ज्ञानेश्वरांनी बालछंदाच्या आपल्या अभंगांत "बालछंदो बावीस जन्में। तोडिलीं भवाब्धीची कम " अशा रीतीने आपल्या बाविसाव्या वर्षी झालेल्या समाधीचा उल्लेख केला आहे. आतां ज्ञानेश्वरांच्या समाधिकालासंबंधानें तो शके १२१८ साली झाला याविषयी नामदेव, विसोबा खेचर, जनाबाई, व चोखामेळा यांचे ऐक--