पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६५२] तत्त्वज्ञान.. यया बोला येरे विचक्षणे । म्हणितले हां जी कवणासि ते उणे । तुम्हीं बकाकरवी चांदिणे । चरवू पहा मां ॥ हां हो उटोनियां आरिसा । आंधळिया दावू बैसा। बहिरियापुढे हृषीकेशा । गाणीव करा ॥...॥ जे अतींद्रिय म्हणोनि व्यवस्थले।केवळ ज्ञानदृष्टीविया भागाफिटले ते तुम्ही चर्मचथूपुढे सूदले। मी कैसेनि देखे ॥ ज्ञा. ११. १५४-१५९.. ५२ दिव्यदृष्टीने ईश्वगचे स्वरूपदर्शन. म्हणोनि तो देवांचा रावो । म्हणे पाते तुज दिव्य दृष्टि देवों । जया विश्वरूपाचा ठावो । देखसी तूं॥ ऐसी श्रीमुखौनि अक्षरे । निघतीना जंव एकसरें। तर अविद्येचे आंधारे। जावोचि लागे ॥...॥ मग दिव्यचक्षुप्रकाश जाहला । तया शानदृष्टी फांटा फुटला।... ययापरी दाविता जाहला । ऐश्वर्य आपुले ॥...॥ एकसर ऐश्वर्यतेजे पाहले । तया चमत्काराचे एकार्णव जाहाले। चित्त समाजीं बुडोनि ठेले । विस्मयाचिया ॥...॥ तेव्हां मनासी मनपण न स्फुरे । बुद्धि आपण न सांवरे। इंद्रियांचे रश्मी माघारे । हृदयवरी भरले ॥...॥ तैसा विस्मित पाहे कोडे । तंव पुढां होतें चतुर्भुज रूपडे । तेचि नानारूप चहूंकडे । मांडोनि ठेलें ॥...॥ प्रथम स्वरूपसमाधान । पावोनि ठेला अर्जुन । सवेचि उघडी नयन । तंव विश्वरूप देखे ॥ . इहींचि दोहीं डोळां । पाहावे विश्वरूपा सकळा । तो श्रीकृष्ण सोहळा । पुरविला ऐसा ॥


............ ज्ञा. ११. १७६-१-९६... १ बुद्धिवानाने. २ तर. ३ स्वच्छ पुसून, घासून. ४ शास्त्रद्वारे ठरले. ५ ठेवले.