पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्ञानेश्वरवचनामृत. [६५३ ५३. अर्जुनाचे अपराधक्षमापनस्तोत्र, म्हणोनि काय काय आतां । निवेदिजेल अनंता । मी राशि आहे समस्तां । अपराधांची ॥ या लागी पुढां अथवा पाठीं। जिये राहाटलो बहुवे वोखटी। तिये मायेचियापरी पोटीं । सामावी प्रभो॥ जी कोणी एके वेळे । सरिता घेऊनि येति खंडळे । तिये सामाविजति सिंधुजळे । आन उपाय नाहीं॥ तैसी प्रीति का प्रमाद । देवेसी मियां विरुद्ध । बोलविली तिये मुकुंद । उपसाहावीं जी ॥...॥ तरि आतां अप्रमेया । मज शरणागता आपुलिया। क्षमा कीजो जी यया । अपराधांसी ॥... ऐसें अर्जुन म्हणितले । भग पुढती दंडवत घातले । तेथे सात्विकाचे आले । भरते तया ॥ मग म्हणतसे प्रसीद प्रसीद । वाचा होतसे सद्गद । काढी जी अपराध- समुद्रौनि ।...॥ पुत्राचे अपराध । जरी जाहाले अगाध । तरी पितां साहे निद्व । तैसे साहिजो जी॥ सख्याचे उद्धत । सखा साहे निवांत । तैसे तुवां समस्त । साहिजो जी॥ ज्ञा. ११.१५५-५७४, ५४. अर्जुनाचे धसाळपण. या अर्जुनाचिया बोला । विश्वरूपा विस्मयो जाहला। म्हणे ऐसा नाहीं देखिला । धसाळ कोणी ॥ १ वाईट. २ गढूळ उदकें. ३ सद्गदित. ४ द्वैतभास सोडून. ५ दांडगेपणा. ६ अविचारी.