पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शानेश्वरवंचनामृत. ५०. ईश्वराचे मुद्दलरूप......... मग बोलिला तो किरीटी । म्हणे तुम्ही केली जे गोठी। तिया प्रतीतीची दिठी। निवाली माझी॥ आतां जयाचेनि संकल्पै । हे लोकपरंपरा होय हारपे।।. जया ठायाते आपणपे । मी ऐसे म्हणसीः॥. ते मदल रूप तुझे । जेथूनि इये द्विभुजे हन चतुर्भुजे । सुरकार्याचेनि व्याजे । घेवों घेवी येसी ॥ पै जळशयनाचिया अवगणिया । कां मत्स्यकूर्म इया मिरवणिया। खेळ सरलिया गुणिया । सांठविसी जेथ ॥ उपनिषदे जे गाती । योगिये हृदयीं रिगोनि पाहाती। जयात सनकादिक आहाती । पोटाळनियां ॥ ऐसे अगाध जे तुझे । विश्वरूप कानीं ऐकिजे । ते देखावया चित्त माझे । उतावीळ देवा ॥ देवे फेडूनियां सांकड । लोभे पुसली जरी चाड । तरि हेचि एकी वार्ड । आर्ति जी मज ॥ तुझे विश्वरूप आघवे । माझिये दिठीसी गोचर होआवे । ऐशी थोर आस जीवें । बांधोनि आहे ॥ ज्ञा. ११.८१-८८. ५१. ईश्वराचे अतींद्रियस्वरूप चर्मदृष्टीने पाहणे शक्य नाही. मग म्हणे उत्कंठे वोहर्ट न पडे। अझूनि सुखाचि सोयं न सांपडे। परि दाविले ते फुडे । नाकळेचि यया ॥ हे बोलोनि देव हांसिले। हांसोनि देखणिया म्हणितले। आम्ही विश्वरूप तरी दाविले । परि देखसीच ना तूं ॥ .: १ अनुभवाची. २ नाहीशी होते. ३ निमित्ताने. ४. सोंगें. ५ गारुडी. ६ संकोच. ७ मोठी. : कमीपणा. ९ मार्ग. १० खरोखर. ११ पहाण्यास तयार झालेल्यास