पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६४१] तत्त्वज्ञान. हे आघवेचि आपुलालिया लोकी । उत्कंठित अवलोकीं। हे महामूर्ती दैविकी । पाहात आहाती ॥ मग पाहात पाहात प्रतिक्षणीं । विस्मित होऊनि अंतःकरणीं । करित निजमुकुटी वोवाळणी । प्रभुजी तुज ॥ ते जयजयघोषकलरवें । स्वर्ग गाजविती आघवे । ठेवित ललाटावरी बरवे । करसंपुट ॥ ज्ञा. ११. ३२६-३३६. ४१. ईश्वर हाच सर्व विश्वाचे मूळ होय. पाहे पां आरंभी बीज एकले। मग तोचे विरूढलिया बुड जाहलें। बुडी कोभ निघाले । खांदीयांचे ॥ खांदीयांपासूनि अनेका । फुटलिया नाना शाखा। शाखास्तव देखा पल्लव-। पाने ॥ पल्लवीं फूल फळ । एवं वृक्षत्व जाहाले सकळ । ते निर्धारिता केवळ । बीजचि आघवे ॥...॥ ऐसेनि है विश्व येथे। मीचि विस्तारिलोसे निरुते। परि भावाचेनि हाते । माने जया ॥ म्हणोनि गा यापरी । ब्रह्मादि पिपीलिकावेरी। मीवाचूनि दुसरी । गोष्टीच नाहीं ॥ ऐसे जाणे जो साचें । तया चेहरे जाहाले ज्ञानाचे। म्हणोनि उत्तमाधमभेदाचे । स्वप्न न देखे ॥...॥ म्हणऊनि अभेदे जो भक्तियोग । तेथ शंका नाहीं नये खंग। करितां ठेला तरी चांग । ते सांगितले षष्ठीं ॥...॥ ऐसेनि जे निजज्ञानी । खेळत सुखे त्रिभुवनीं। जगद्पा मनीं । सांठवूनि माते ॥ १ मंजुळ शब्दान. २ जोडलेले हात. ३ अंकुर आल्यावर. ४ बुंधा. ५ अंकुर. ६ पटेल. ७ मुंगीपर्यंत. ८ जागृति. ९ प्रतिबंध. १० राहिला.