पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्ञानेश्वरवचनामृत. [६४१ जे जे भेटे भूत । ते ते मानिजे भगवंत । हा भक्तियोग निश्चित । जाण माझा ॥ - ज्ञा. १०.९८-११८. ४२. विषमभूतग्रामामध्ये एकाच समवस्तूचे दर्शन. भूतें आघवींचि होती । एकाची एक आहातीं । परि मैं भूतप्रतीती । वेगळाली असे ॥ यांची नामही आनाने । अनारिसीं वर्तने । वेषही सिनाने । आघवेयांचे ॥ ऐसे देखोनि किरीटी । भेद सूसी हन पोटीं। तरि जन्माचिया कोटी । न लाहसी निघों ॥ पैं नानाप्रयोजनशीळे । दीर्घं वक्रे वर्तुळे । होती एकीचींचि फळे । तुंबिणीयेची ॥...॥ हे भूतग्राम विषम । परि वस्तु ते एथ सम । घटमठी व्योम | जियापरी ॥ हा नाशता भूताभास । एथ आत्मा तो आविनाश । जैसा केयूरादिकी कस । सुवर्णाचा॥ एवं जीवधर्महीन । जो जीवेसीं अभिन्न । देखे तो सुनयन । शानियांमाजीं॥ शानाचा डोळा डोळसां- माजि डोळस तो वीरेशा। हे स्तुति नोहे बहुवसा । भाग्याचा तो ॥...॥ म्हणोनि तो दैवागळा । वानीत असो वेळोवेळां । जे साम्यसेजे डोळा । लागला तया ॥ ज्ञा. १३. १०५९-१०८०, - १ निरनिराळी. २ भिन्नभिन्न. ३ त-हेत-हेचे. ४ धरिशील. ५ नानाप्रकारच्या कामी उपयोगी पडणारी. ६ भोपळीची. ७ आकाश. ८ झोंप लागली.