पान:जातिभेदविवेचन.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ -- . चिनी कोण ? तर मनुष्य. हा धष्टपुष्ट गलेलठ्ठ पठाण कोण? तर मनुष्य. याप्रमाणे जिकडे जावें व जिकडे पहावे तिकडे एक मनुष्यजात. पण तसे ईश्वरकृत पश्वादिकांच्या जातींत आहे काय? हा शृंगी कोण? तर बैल. हा नखी कोण ? बोका. दाढीवाला कोण? तर बोकड. हा चेष्टेखोर प्राणी कोण? तर माकड. हा गोंडाळ शेपट्या कोण? तर खोकड. हा केसाळ बुवा कोण? तर अस्वल. हा आकाश- मुनी कोण ? तर उंट. अशा भिन्न भिन्न जाती तेव्हांच ओळखितां येतात, आणि सर्वत्र हाच भेद मानिला जातो. ६. कोणी असें ह्मणतात की, जीव तेथून एकच, मग तो पशुजीव असो, की मनुष्यजीव असो. हे मत मनुष्यजातीचें भिन्नत्व स्थापण्याकरितां जरी कोणी पुढे आणीत नाहीत तरी निर्बुद्ध प्राण्यांचे मनुष्यापासून अभेदत्व स्थापण्याकरितां याची योजना करितात. परंतु देवाने बुद्धिहीन पश्वादि प्राणी व बुद्धिविशिष्ट मनुष्य प्राणी यांचा भेद स्थिर राखण्याकरितां फार चमत्कारिक बंदोबस्त केला आहे. ज्याला आपण जीव ह्मणतों तो प्राण्याच्या रक्तांत आहे. विद्वान लोकांनी असा शोध लाविला आहे की, मनुष्याचे रक्त पश्वादिकांच्या रक्ताहून भिन्न आहे. त्याच्या कणांचा आकार अशा प्रकारचा आहे की,