9 रणार्थ क्रूर लांडगा व सौम्य मेंढरं यांचे गुण पाहा, अथवा हिंस्र व्याघ्र व गरीब गायी यांचे गुण लक्षात आणा. ही साम्यता एथें शोभत नाही, तरी ज्या मानसिक गुणांची छाया मात्र पश्वादिकांत दिसते ती देखील सारखी नाही. ह्या प्रमाणाच्या संबंधाने आणखी असे सांगितले पाहिजे की, मनुष्याचे न्युनाधिक गुण शिक्षणानें व संवयीने वाढ- वितां येतात, परंतु कोल्ह्याची धूर्तता गाढवाच्या अंगी को- णत्याही उपायाने आणतां येणार नाही, अथवा माकडाच्या चेष्टेखोर स्वभावाचें बकऱ्याला अनुकरण करितां येणार नाही, व कुत्र्याच्या वागडण्याचा अथवा स्वामिनिष्ठेचा स्वभाव रेड्याचे अंगी घालता येणार नाही. ज्याचा स्वभाव त्याला. परंतु मनुष्याचा स्वभाव सर्वत्र सारखाच असून, त्यांत जें आगंतुक भिन्नत्व असतें तें अनेक उपायांनी दूर करितां येतें. ५. आणखी असें पाहा की, मनुष्याला सर्व भूमंडळावर एकच जातिवाचक नांव आहे, तो कोणत्याही राष्ट्राचा, बंशाचा, कुळाचा, गोताचा असो तरी त्याची जात मनुष्यच. हा काळा काळा भिन्न भिल्ल कोण? तर मनुष्य. हा गोरा गोरा पान चितपावन कोण? तर मनुष्य. हा ठेंगणा टपुरा गुर- ख्या कोण? तर मनुष्य. हा चपट्यानाकाचा पिवळट रंगाचा
पान:जातिभेदविवेचन.pdf/७
Appearance