पान:जातिभेदविवेचन.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७ तेंच मात्र त्याच्या शरीरांतील रक्तवाहिन्यांत सहजगतीने व सुखाने फिरतें; दुसऱ्या प्राण्याचे रक्त मनुष्याचे शरिरांत सोडले तर त्याला अतिशय त्रास होतो, परंतु मनुष्याचे रक्त मनुष्याच्या शरीरांत घातले तर त्यापासून त्याला सुख होतें. या प्रमाणावरून दोन गोष्टी सिद्ध होतात; एक ही की, म- नुष्य व पश्वादि प्राणी हे एक जीव नाहीत, जीव तेथून एक नाहीं; व दुसरी ही की मनुष्यजात एका रक्ताची आहे. ख्रिस्ती शास्त्रांतील सिद्धांताच्या सत्यतेला हा विद्येसंबंधी शोध साक्ष देतो. तो सिद्धांत हा की, देवाने मनुष्यांची सर्व राष्ट्र पृथ्वीच्या पाठीवर राहण्यासाठी एकाच रक्तापासून उत्पन्न केली." . प्रकरण २. जातिभेद बुद्धिविरुद्ध आहे. मागल्या प्रकरणांत जी प्रमाणे दाखविली त्यांजवरून पाहतां मनुष्यांमध्ये जो जातिभेद मानितात तो सृष्टिविरुद्ध