Jump to content

पान:जातिभेदविवेचन.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

. . ३. आणखी असे पहा की, ज्या भिन्न भिन्न जाती ईश्व- राने केल्या आहेत त्यांच्या मिश्रणाने त्यांची संतति वाढून नवी जात उत्पन्न होत नाही, आणि यदाकदाचित् घोडा व गाढव यांच्यासारख्या जवळजवळच्या जातींपासून संतति झाली तर तिचा वंश वाढत नाही. परंतु मनुष्याविषयी असा नेम दिसून येतो काय ? ज्याला वर्णसंकर ह्मणतात तो केवळ ईश्वरी नियमच आहे, ह्मणजे कोणत्याही मनु. प्याला जातिसंबंधाने कोणत्याही स्त्रीपासून संतति होण्याला सृष्टिनियमाचा प्रतिरोध नाही. ४ मनुष्याचे शरीररचनेवरून त्याच्या जातिऐक्याविषयी जी दृढ प्रमाणे मिळतात ती सोडून त्याच्या मनाकडे पा- हिले असतांही हेच कबूल करावे लागते की, मनुष्यजात एक आहे. सर्व मनुष्यांस देवाने आत्मा दिला आहे, व त्या आत्म्याला अंतःकरण, मन, चित्त, बुद्धि, अहंकार ही आ- हेत. सर्वांच्याठायीं प्रीति, दया, आशा, भय इत्यादि चित्त- वृत्ति आहेत. जर मनुष्यजात एक नसती तर ही मनाची प्रकृति भिन्न भिन्न असती, व आत्म्याच्या गुणांची संख्या समान नसती, परंतु असें कोठें दिसून येत नाही, केवळ पशुपक्ष्यांमध्ये जातिभेदामुळे मात्र हे वैगुण्य आहे. उदाह-