३ . . अभेदावरून त्याची जात एक आहे असें प्रमाण मिळतें इत- केंच नाही, तर त्याच्या शरीराची अंतर्बाह्य रचनाही सर्वत्र सारखी आहे, हे दुसरें एक सबळ प्रमाण त्याच्या जातिऐ- क्याविषयी आहे. पशुपक्ष्यांमध्ये असें ऐक्य नाही. उदाहरणार्थ कांसव व ससा यांची शरीरें पाहा. कांसवाच्या अंगावर ढालीसारखी जाड कंवची आहे, आणि सशाच्या अंगावर मऊ केश आहेत. कांसवाचे कान कोठे आहेत हे समजत देखील नाही, आणि ससा तर कानांवरून ओळखतां येतो. कांसवाची उत्पत्ति अंड्यांपासून आहे. सशाला पिलें होतात, कांसवाच्या शरीराचे व्यवच्छेदन करून त्याचे अंतरावयव पाहिल्याने सशाचे शरीराची रचना समजत नाही, त्या क- रितां सशाचेंच शव फाडले पाहिजे. तर असा भेद मनुष्य जातीमध्ये आहे काय? सर्व देशांत मनुष्याच्या शरीराची रचना सारखीच आहे. त्याच्या शरीराकडे पाहून जातीचा आहे असे सांगता येणार नाही, कारण तो एकाच जातीचा आहे; तशीच त्याची अंतररचना. वैद्यशास्त्राचा अभ्यास करणारास मनुष्याच्या शवाचें छेदन करून त्याचे अंतरावयव पाहावे लागतात, ह्या कारणासाठी कोणत्याही देशांतील मनुष्याचे शव घेतले असतां चालतें. तो अमक्या .
पान:जातिभेदविवेचन.pdf/५
Appearance