Jump to content

पान:जातिभेदविवेचन.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४१ करावी, फुटक्या मृन्मय पात्रांत भोजन करावें, लोखंडाचे अलंकार धारण करावे. नित्य भ्रमण करीत राहावें. यांस अन्न देणे असतां साक्षात् आपण देऊ नये. तर चाकरा- कडून फुटक्या पात्रांत द्यावें.' (मनु. १०. ५२, ५३ ). जे पदार्थ आरोग्यरक्षणार्थ मनुष्याला वयं किंवा ग्राह्य असावे, ते जातीच्या संबंधाने कित्येकांस सेवन कर- ण्याची मोकळीक आहे, व कित्येकांस त्यांचा प्रतिबंध आहे, तेणेकरून त्यांची बहुत हानि होते. उदाहरणार्थ, कित्येक जाती दारू पितात, कित्येक अफू खातात, कोणी गांजा ओढतात, कित्येक जाती मेलेल्या जनावरांचे मांस खातात, कित्येक जाती मासेच खातात व दुसऱ्या जातीचे लोक मांस खात नाहीत. अशा चालींमुळे कित्येक जातीला असे रोग आहेत की ते दुसऱ्या जातींत नसतात व कित्येक जातींच्या लोकांची प्रकृति जितकी चांगली असते, तितकी दुसऱ्यांची नसते. जे जातिभेद न मानणारे वैद्य आहेत त्यांस जातीचे कडक नियम पाळणाऱ्या हिंदु रोग्यांस औषध देण्याला व पथ्यपाणी सांगण्याला ह्याच कारणावरून अडचण पडते. कित्येक लोक जातिनियमाला अनुसरून लिहिणे वाचणे शिकत