Jump to content

पान:जातिभेदविवेचन.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४० नाहीत. कित्येक गुडध्यांच्या वरच चोळण्याप्रमाणे लुगडे कंबरेस गुंडाळतात. कोळी लोक पायघोळ अंगरखा घाल- तील पण कमरेस लंगोटा ! हा त्यांच्या जातीचा निबंध ! जातीप्रमाणे वस्त्रे पांघरण्याचे व शरीर झांकण्याचे नियम दक्षिण हिंदुस्थानांतील लोकांत अद्याप फार कडकडीत आहेत. अलंकाराविषयीही असेंच; सोने, चांदी, तांबे,

,

कथील, कांसें यांचे अलंकार जातिभेदाप्रमाणे लोक वापरतात. जसे अन्नवस्त्रांविषयीं जातीचे नेम आहेत तसेच घरां- विषयीं. झोपडीत राहणारे लोकांपाशी द्रव्य असले तरी जातीच्या भयामुळे त्यांस माडी बांधवत नाही; घराला चुना लावणे किंवा घरासमोर बागबगीचा करून स्वच्छता ठेवणे हे देखील कित्येक जातींचा नियमांविरुद्ध आहे. महारामांगांच्या दारापुढे तुळशीबाग व रम्य पुष्पवाटिका कोणी कधी पाहतो काय ? तिजवर जणूं काय ब्राह्मणा- दिकांचा मात्र हक्क आहे. महारवाड्यांत झोपडी खेरीज दुसरी कोणती इमारत दृष्टीस पडते काय ? " चांडाळ व श्वपच या दोघांनी गांवाच्या बाहेर राहावें. ज्या लोहादि पा- त्रांवर यांनी भोजन केले ती पात्रे पुनः व्यवहारांत घेऊं न- येत. यांचे धन कुत्रे, गर्दभ जाणावें. यांनी शववस्त्र धारण व