Jump to content

पान:जातिभेदविवेचन.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४२ . नाहीत. हातांत लेखणी धरणे, किंवा पांढऱ्या कागदावर काळी रेघ ओढणे हे पाप आहे असे त्यांस वाटते. कित्येकांस भीक मागणें हें स्वजातीचें कर्म आहे असे वाटते, ते कोणताही धंदारोजगार न करितां जन्मभर भीकच मागतात. अशांमध्ये ब्राह्मण हे पहिल्या नंबरचे अधिकार- विशिष्ट किंवा सनदी व संभावित जातभिकारी आहेत. कित्येक जाती अशा आहेत की त्यांस चोऱ्या करणे, दरोडे घालणे हीच आपली स्वकर्मे आहेत असे वाटते. कि- त्येक जातींच्या स्त्रिया कसब करणे हा आपल्या जातीचा धंदा समजतात. कसबिणी बायकांमध्येहि उंचनीच जाती झाल्या आहेत. ह्या सर्वांची सुधारणूक होण्याला जातिभेद महाप्रतिबंधक आहे. ४ जातिभेदामुळे हिंदु लोकांत स्वजातीच्या लोकांखेरीज इतरांशी लग्नव्यवहार होत नाही. हा नियम अन्नव्यवहारापेक्षा 'फार कडक आहे. अन्नव्यवहाराने बाटलेल्याला एखाद्या वेळी प्रायश्चित्तानें शुद्ध करितां येईल, पण ज्याने परजा- तीच्या स्त्रीशी लग्न केलें तो स्वजातींतून उठलाच, आणि स्त्रीलाही स्वजात सुटली. ब्राह्मणाविषयीं तर हा फारच कडक कायदा आहे. शूद्रस्त्रीशी लग्न करणाऱ्या ब्राह्मणाला प्रायश्चित्त