या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
नृताशौच व जननाशौच यांविषयी जे नियम आहेत ते सर्व जातींस समान नाहीत. "उपनयन [ मुंज ] झालेल्या सपिंडाचें मृताशौच, अथवा जननाशौच [ सूतक व सुयेर ] यांपासून ब्राह्मण दहा दिवसांनी, क्षत्रिय बारा दिवसांनी, वैश्य पंधरा दिवसांनी, आणि शूद्र तीस दिवसांनी याप्रमाणे शुद्ध होतात. विवाह हा शूद्राला उपनयन स्थानापन्न जा- णावा.” ( मनु० ५. ८३.) याप्रमाणे आणखी पुष्कळ गोष्टींवरून असे दाखवितां येईल की, जातिसंबंधी बहुतेक नियम बुद्धिविरुद्ध आहेत, ह्मणजे ते पाळण्याचे योग्य कारण सांगता येत नाही. असे नियम ईश्वर लावून देणार नाही. त्याने मनुष्यजात एक केली आहे, व ज्या स्वाभाविक व सृष्टिनियमांनी तिचे पा- लनपोषण व वर्तन होते ते सर्वत्र समान व सर्वांस सारखे " सुखप्रद आहेत.