१५ . व गाढव अतिनीच जातीच्या लोकांशिवाय कोणालाच चा- लत नाही. तसेंच गाढवें बाळगणाऱ्या जातीविषयी चम- त्कारिक नियम आहेत. परीट व कुंभार हे गाढवें बाळगि- तात त्यांस स्पर्श झाला असतां फारसा विटाळ नाही; पण गाढवास प्रत्यक्ष शिवले असतां विटाळ होतो. दोन गाढ- वांच्या मधून जाणे वर्ज आहे. निर्जीव पदार्थाच्या स्पर्शाचे असेच मूर्खतेचे नियमांनी जात बांधलेली आहे. उदाहरण, कापूस व कच्चे सूत सो- वळ्यांत चालतें, पण वाळलेलें सूत चालत नाही. परटाच्या घरची स्वच्छ वस्त्राची घडी सोंवळ्यांत चालत नाही, परंतु महिनाभर न धुतलेली मळीन लोकरीची धाबळी किंवा किड्यांपासून उत्पन्न झालेल्या रेशमाचा पितांबर व हरणाचें कातडें देवपूजेच्या वेळी नेसण्यास व आसनास शुद्ध आहे, पण त्याच्या ठिकाणी बकऱ्याची सागळ आणली तर मोठा भ्रष्टकार होईल. “मनुष्याचे ओल्या हाडांचा स्पर्श झाला असतां ब्राह्मणादिक स्नाने करून शुद्ध होतो. शुष्क हाडांचा स्पर्श झाला असतां आचमन करून गाईला स्पर्श अथवा सूर्यदर्शन यांतून एक केल्याने शुद्ध होतो." ( मनु० ५.८७) "
पान:जातिभेदविवेचन.pdf/१७
Appearance