प्रकरण ३. जातिभेद नीतिविरुद्ध आहे. . . मनुष्यांचें परस्परांशी जें यथान्याय वर्त्तन त्याला नीति ह्मणतात. ह्या वर्तनाचे स्वरूप जसा ज्याशी आपला संबंध असेल तसे असते. जगांत अनेक प्रकारचे संबंध आहेत; गोत्रसंबंध, सुहृत्संबंध, जनसंबंध, राजसंबंध, स्वामिसंबंध, इ०. हे स्वाभाविक, व्यवहारजन्य, देशजन्य असेही आहेत. ह्या संबंधांप्रमाणे आमची कर्तव्ये जरी निरनिराळी असली तरी सर्व मनुष्यांशी जो आपला साधारण बंधुत्वाचा संबंध आहे त्यांत प्रीति, दया, स्नेह, न्याय, उपकार इ० सद्गुण अ- सलेच पाहिजेत. ह्यांस अनुसरून वागणे हीच उत्तम नीति होय. परंतु सृष्टिविरुद्ध व बुद्धिविरुद्ध असा जो जातिभेद त्याच्या योगानें पूर्वोक्त संबंध सदृढ न राहतां तदुत्पन्न जी क- तव्ये तीही शिथिल होतात. जातीनें नीतीला तिच्या आसना- वरून खाली ढकलून देऊन व तिचे हक्क बळकावून आपलें जुलमाचें राज्य स्थापिलें आहे, हे पुढील विचारांवरून प्रति- पादित होतें. १ मनुष्याने मनुष्याला जवळ ध्यावे, व त्याजवर प्रीति जा.२
पान:जातिभेदविवेचन.pdf/१९
Appearance