Jump to content

पान:जातिभेदविवेचन.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

निर्जिव पदार्थ व स्त्रीपुरुषांच्या अनेक अवस्था यांस अनु- सरून आहेत, व ते सर्व जातींस सारखे नाहीत. जो मनुष्य स्नान करून व सोवळे नेसून देवपूजेस किंवा भोजनास वसतो तो आपल्या जातीच्या व कुटुंबाच्या ओंवळ्या मनु- ष्यास देखील शिवत नाही, मग परजातीच्या मनुष्यास शिवणे तर दूरच आहे. कित्येक जाती अशा मानिल्या आहेत की, त्यांस केव्हाही शिवले असतां विटाळच होतो, तथापि त्यांच्याच सारिख्या नीच, (व त्या परधर्मी अस- ल्यामुळे विशेष नीच) अशा दुसऱ्या जाती आहेत तरी त्यांस शिवल्याचा विटाळ धरीत नाहीत. उदाहरणार्थ महा- राच्या स्पर्शाने जसा विटाळ होतो तसा मुसलमानाच्या किंवा पारशाच्या स्पर्शाने होत नाही, आणि पाहिले असतां महार हिंदूंत गणिला आहे, आणि मुसलमान व पारशी हे तर परदेशी, परधर्मी, म्लेंच्छ व यवन असे आहेत. पशुपक्ष्यांविषयी कुत्रा, गाढव, कावळा, घार, गिधाड, इ० अशुद्ध आहेत, त्यांच्या स्पर्शानें विटाळ होतो; मांजर, घोडा, बैल, चिमणी, राघू इ० पवित्र आहेत, त्यांस घरांत ठेवल्याने जातीला वाट लागत नाही. ब्राह्मणास मांजर सोवळ्यांत चालतें, कुत्रा कित्येक जातींत ओंबळ्यांत चालतो, -