- खालच्या पायरीवर उतरतो तसतसा तो वरच्या जातीचे अन्न खाण्यास मोकळा होतो. अंत्यज (महार, मांग) यांस तर सर्वांच्या हातचे खाण्याला मोकळीक आहे. "ब्राह्मणा- ला ब्राह्मणाचे अन्न अमृत आहे, क्षत्रियाचे अन्न दूधाप्रमाणे आहे, वैश्याच्या घरचे अन्न अन्नाप्रमाणे आहे, आणि शूद्राचें अन्न रक्ताप्रमाणे आहे." "ब्राह्मणाचे अन्न पवित्र आहे, क्ष- त्रियाचे मांसाप्रमाणे आहे, वैश्याचे अन्न शूद्राप्रमाणे आहे, आणि शूद्राचे अन्न नरक आहे" (अंगिरा स्मृति.) हे जर खरे आहे तर विदुराच्या घरी कृष्ण जेवीत असे, व चोख्या- मेळ्याची अंबील विठोबा पीत असे तेव्हा तो काय खात असे? ४ जातीच्या संबंधाने कित्येक कमें करण्यास मोकळीक अथवा मनाई आहे, तिजविषयी विस्ताराने लिहिण्यास एथें जागा नाही. पण तिलाही काही योग्य कारणे आहेत असें नाही. "अशी आमच्या जातींत चाल नाही, अथवा आ- मच्या जातीची हीच चाल आहे, हा आमचा जातिधर्म आहे.” हीच काय ती आचरणाराची अथवा वर्ज कारणा- राची महाकारणे व महाप्रमाणे होत. ५ स्पास्पाविषयी जे जातीचे नियम आहेत तेही बुद्धीच्या विरुद्ध आहेत. हे नियम मनुष्य, पशु, पक्षी, अनेक 9 -
पान:जातिभेदविवेचन.pdf/१५
Appearance