Jump to content

पान:जातिभेदविवेचन.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

निरनिराळे नियम बांधलेला आहे, तो त्याने उल्लंधिला अ- सतां त्याला त्याचे लोक दोष लावितात. मराठ्याचें पागोटें सोनार घालीत नाही, व सोनारासारिखें ब्राह्मण धोतर ने- शीत नाही. अशाप्रकारचा प्रतिबंध मनुष्याला कां असावा हे माझ्या बुद्धीला उमजत नाही. मेंढराला आपलें केशाचें आच्छादन बदलून गाईचे अथवा रेड्याचे कातडे पांघरवत नाही, याचे कारण सहज समजतें, व ते योग्य आहे असे आपल्या बुद्धीला वाटते, परंतु धनगरानें कांबळी पांघरावी व ब्राह्मणाने मात्र पितांबर किंवा मुगटा नेसावा असें देवाने लावून दिले आहे काय ? जातीचा नियम आहे ह्मणून म- हार जेवतेवेळी आपली वस्त्रे बदलींत नाही, व जातिनि- यमामुळे ब्राह्मण वस्त्रांतर केल्याशिवाय भोजनास बसत नाही. मनुष्यजात जर एक आहे तर हा वस्त्रांतराचा अधिकार सर्वांस कां नसावा? ब्राह्मणाचा मुलगा मोठा झाला ह्मणजे लंगोटी टाकून जसें निऱ्यांचे धोतर नेसूं लागतो तसें कुण- व्याच्या मुलाने कां करूं नये ? त्याने चोळणाच कां घालावा, अथवा तो धोतर ल्याला तर ते त्याने अमुकच रीतीनें कां ल्यावें? ३. भक्ष्याभक्ष्याविषयी जे जातिनियम आहेत तेही बुद्धि- .