Jump to content

पान:जातिभेदविवेचन.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११ . विरुद्ध आहेत. जो पदार्थ आपणास रुचत नाही किंवा पचत नाही तो खाऊ नये अशी आपली बुद्धि सुचविते, पण ह्या नियमास अनुसरून जात चालत नाही. सर्व भक्ष्य पदार्थ ईश्वराने सर्व मनुष्यांकरितां केले आहेत, पण जात ह्मणते की, असें नाही. तिचे नियम असे आहेत की, कित्येक पदार्थ अमुकच जातीनें खावे, जातीनें खावे, व कित्येक दुसऱ्या जातीने खावे. कोणी मांस खातात, व कोणी मत्स्य खातात, व कोणी केवळ वनस्पति व धान्य मात्र भक्षण करितात. कित्येक जाती अशा आहेत की, त्या अमुक एक जनावराचें मांस खातील व दुसऱ्या जनावराचे खाणार नाहीत. कोणी कबूतरें खातात पण कोंबडी खात नाहीत, कोणी रानडुकर खातात पण गांवडुकराला शिवत देखील नाहीत. हे नियम वैद्यशास्त्राला, पाकशास्त्राला, किंवा आरोग्यशास्त्राला अनुसरून आहेत असे नाही. ब्राह्मणास बोंबील, झिंगे इ० मासे जिरत नाहीत, अथवा शेणव्यास बकऱ्याचे मांस भावत नाही ह्मणून तो तें खात नाही, असें नाहीं; अथवा कांदा खाल्याने वैष्णवाचे डोकें उठतें, व ताडगोळ्याने लिंगा- इताचे पोटांत कळ येती ह्मणून तो ते खात नाही, असें नाही; तर केवळ जातीच्या नियमांमुळे त्यांस हे पदार्थ वर्ण्य .