Jump to content

पान:जातिभेदविवेचन.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

o/ शिवू नये, अथवा त्यांचा शिंतोडाही एकमेकांच्या अंगावर उडूं नये किंवा त्यांची सावली एकमेकांच्या अंगावर पडूं नये, त्या चौघांनी चार प्रकारची वस्त्रे नेसावी व ती कधीं बदलू नयेत असा मी नियम करितों काय ? जर मी असें करीन तर लोक मला वेडा झणणार नाहीत काय? तथापि अशीच वर्तणूक जातिभेद मानणारांमध्ये आहे. कर्मावरून ज्या जाति झाल्या त्यांचा अन्नव्यवहारादि संबंध वेगळा कां असावा ? आणि जर एका जातीच्या मनुष्याने आपल्या वडिलांचा धंदा सोडून दुसऱ्या जातीचा धंदा पत्करिला तर त्याने त्याच्या जातींत कां मिळू नये ? परंतु असें दिस- ण्यांत येत नाही. शिंप्याने कपडे शिवण्याचा धंदा सोडून जोडे शिवण्याचा उद्योग चालविला तर कदाचित् तो चांभा- राच्या जातींत मिळेल, परंतु चांभार शिंप्याचे काम शि- कला तरी शिंपी त्याला आपल्या जातींत कधी घेणार ना- हीत. आणि एकाच प्रकारचा धंदा करणारे लोक तरी आ- पणाला एक जातीचे समजतात काय ? गुजराथेतील शिंपी मराठी शिंप्याशी संबंध ठेवीत नाहीत, व कर्नाटक देशां- तील सोनारांचे कोंकणांतील सोनारांशी जमत नाही. इतकेच नाही, तर प्रत्येक जातीच्या पोशाकाचा देखील