पान:जातिभेदविवेचन.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

< आहे असे सिद्ध होते. आता हा भेद बुद्धिविरुद्ध आहे हे आह्मी दाखवितों. १. माझ्या बुद्धीस असे वाटते की, जो प्राणी सर्वप्रकारे माझ्यासारिखा आहे त्याला मी भिन्न जातीचा कसें ह्मणावें? कोणतेही दोन पदार्थ सजातीय आहेत किंवा नाहीत हे समजण्याकरितां जी कसोटी माझ्यापाशी आहे त्याच क- सोटीला हा जातिभेद कां लावून पाहूं नये ? कोणतीही दोन जनावरें कुत्र्याच्या जातीची आहेत किंवा नाहीत हे ज्या नियमांवरून मला समजते त्याच नियमांनी मला सम- जते की, माझ्यासारिखे दोन प्राणी मनुष्यच आहेत. तर त्यांची जात वेगळाली आहे असें मी कसे मानावें ? २. कोणी ह्मणतात की, हा जातिभेद कर्मावरून पडला, मूळ प्रकृतीवरून नाही. हे जर खरे आहे तर नाना प्रका- रचे धंदे करणारे मनुष्यांशी ते भिन्न जातीय मनुष्य अस- ल्याप्रमाणे मी कां वागावें? असे समजा की, मला चार पुत्र आहेत, व ते चौघे चार निरनिराळे धंदे करितात, ह्मणून त्यांस मी वेगळाल्या चार कोठड्यांत बसवून चार ठिकाणी चार प्रकारचे अन्न खायास घालतों काय ? अथवा सर्वांस पंक्तीस घेवून जेवतों ? त्या चौघांनी एकमेकांस