पान:जपानचा इतिहास.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९४
जपानचा इतिहास.

घालवून देऊन ते पुन्हां न येतील असा बंदोबस्त केला पाहिजे.' ह्या समजुतीमुळे त्यांनी कित्येक वर्षे परकीय लोकांवर एकसारखा दांत ठेवला होता. त्यांनी त्यांच्या वसाहतींवर कित्येक वेळां हल्ले केले. इ. स. १८६१ ह्या वर्षों अमेरिकन वकीलाच्या सेक्रेटरीचा खून झाला, व इंग्लिश वकीलाच्या बरोबरीच्या पुष्कळ लोकांना बन्याच जखमा झाल्या. १८६२ ह्या वर्षी एक इंग्रजी गृहस्थ वाटेने जात असतां ठार मारला गेला. १८६३ साली इंग्लिश वकीलाकरितां बांधलेल्या कांहीं नवीन इमारती कोणी एका- एक सुरुंगाने उडवून दिल्या. अशा प्रकारचे पुष्कळ भयंकर प्रकार वारंवार होऊ लागले. पन्नास परदेशीय लोक ठार • झाले. त्या खून करणारांना असें वाटे की, आपण मोठीच देशसेवा करीत आहोत, व ह्या आपल्या करण्यानें देव संतुष्ट होतील. इतकें झालें तरी परकीय डगमगले नाहींत. ह्मणून आजकाल त्यांच्या वंशजांचा तेथे चांगला काळ आहे. हेंच जर कां. त्यांनी कंटाळन जपान देश सोडला असता, तर त्यांची तेथें इतकी योग्यता राहती कीं नाहीं ह्याबद्दलच शंकाच आहे. शिवाय जपान देशही आज उदयाला आला नसता.

 शोगुनच्या सत्तेचा लय -- आधींच शोगुननें बळजब- रीनें सत्ता पटकावलेली, त्यांतून त्यानें परराष्ट्रांशी तह केवळ आपल्या मतानेंच केले व लोकांना असंतुष्ट केलें. मग काय विचारतां ? " शोगुनकडे वास्तविक कांहींच अधिकार नाहीं. मिकाडोचा योग्य मान राखा. रानटी लोकांना हाकलून द्या. " अशी सर्वत्र एकच हाकाटी पिकली, इतक्या संधींत