पान:जपानचा इतिहास.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण १७ वै.

९३


‘अमटेरसु' ह्म • जी‘सूर्यदेवता ’त्या देवतेला गा-हाणीं घालण्यास सुरवात केली. परंतु पुष्कळ सुजाग लोकांना असेंही वाटले कीं, परकीय लोक आपल्या देशांत आले ह्मणून कांहीं विच डलें नाहीं; कारण कीं आपणास शिकण्यासारख्या त्यांच्याज - . वळही पुष्कळ गोष्टी आहेत.

 आदल्यावर्षी सांगितल्याप्रमाणें पेरी दुसऱ्यावर्षी आठ जहाज घेऊन आला. आल्यावर त्यानें एक लहानशी रेल्वे व एक छोटेसें तारायंत्र सुरू केलें. ती अजब कल्पनेची कृती पाहून जपानी लोक परम विस्मित झाले, व त्यांच्या मनांत पेरीविषयीं व सामान्यतः अमेरिकन लोकांविषयीं पूज्यबुद्धि उत्पन्न झाली. पेरी बरेच दिवस जपानांत राहिल्यानंतर अखर एक- दाचा अमेरिका व जपान ह्या दोन राष्ट्रांमध्ये तह झाला. अमेरि- कन लोकांस व्यापाराकरितां दोन बंदरें मिळाली. अमेरिकेने आपला पाय जपानांत शिरकविलेला पाहिल्याबरोबर इतर राष्ट्रांनीही आपला पाय शिरकविण्याबद्दल प्रयत्न चालविला. इ. स. १८५८ साली लॉर्ड एल्जिन यांची स्वारी थेट येक्लो येथपर्यंत गेली व त्यांनी जपानच्या मिकाडोशी तह करून कांही बंदरें आपणास व्यापाराकरितां मिळविलीं. तेव्हांपासून इंग्लिशांचा वकील जपानच्या राजधानींत राहू लागला आहे.

 युरोपियनांनी व अमेरिकनांनीं आपली ठाणीं अनेक निरनिराळ्या बंदरी बसविलीं; व त्यांच्या व्यापारापासून होणान्या हिताकडे लक्ष्य पोंचवून, लोकही त्यांच्याशी गोडी- गुलाबीने वागत होते. परंतु सामुराई वर्गीतील लोकांना असें वाटू लागलें कीं, 'आपली देवभूमी परकीयांच्या पादस्पर्शानें अगदीं विटाळून जात आहे. ह्या रानटी लोकांना